WhatsApp

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, पुढील ५ दिवस अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई :
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने (IMD) विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३ ते १८ ऑगस्ट या कालावधीत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर वाढेल. आज (१२ ऑगस्ट) चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण पट्ट्यात बहुतांश ठिकाणी पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. ठाण्यासह पुणे, सातारा, नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथेही पावसाचा यलो अलर्ट आहे, तर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांमध्येही पावसाची हजेरी राहणार आहे.

पुढील चार दिवसांसाठी अलर्ट
१३ ऑगस्ट: यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१४ ऑगस्ट: नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे ऑरेंज अलर्ट असून, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, बीड, अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, ठाणे आणि पालघर येथे यलो अलर्ट कायम आहे.

Watch Ad

१५ ऑगस्ट: यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, रत्नागिरी येथे ऑरेंज अलर्ट, तर नागपूर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अहमदनगर, पुणे, रायगड, सातारा, ठाणे, पालघर येथे यलो अलर्ट आहे.

१६ ऑगस्ट: बुलढाणा, अकोला, अमरावती, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे येथे ऑरेंज अलर्ट असून, नंदुरबार, धुळे, जालना, वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, कोल्हापूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकण आणि विदर्भात बहुतेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!