अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | शहरात एका २२ वर्षीय युवतीचा आठ दिवसांपासून विनयभंग करणाऱ्या विकृत रद्दीवाल्याला अखेर अटक करण्यात आली. अकोट फैल येथील फिरोज खान रफिक खान याच्यावर रामदास पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीने दाखवलेल्या धाडसामुळे हा प्रकार उजेडात आला.
दिवसेंदिवस वाढत होता छळ
रामनगर परिसरातील एका खाजगी लॅबमध्ये काम करणारी ही तरुणी दररोज पायी कामावर जात होती. मात्र, लॅबजवळच रद्दीचा धंदा करणारा आरोपी फिरोज खान तिला सातत्याने अश्लील हावभाव करत होता, शिवीगाळ करत होता. इतकेच नव्हे तर “तू घोडी झाली पाहिजे” अशा घाणेरड्या आणि अपमानास्पद वाक्यांचा वापर करून मानसिक छळ करत होता.
शेवटी मुलीनेच पकडला आरोपी
या विकृत छळाला कंटाळून बुधवारी पीडित तरुणीने स्वतः आरोपीला पकडले आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. लॅबमधील सहकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. दामिनी पथकाने काहीच मिनिटांत घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले आणि रामदास पेठ पोलिस ठाण्यात आणले.
गुन्हा नोंद, आरोपी कोठडीत
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ७४, ७५ व २९६ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलीस निरीक्षक शिरीष खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदीप जोगदंड पुढील तपास करत आहेत.
याआधीही एक प्रकरण समोर आले होते
५ जुलै रोजी नायगाव येथील ऑटोचालक जाफर खान सुभेदार खानने एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. सतर्कतेमुळे ती विद्यार्थिनी ऑटोमधून उडी मारून वाचली आणि थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणातही पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला दोन तासांत अटक केली.
सामाजिक प्रश्न – एकाच धर्माच्या महिला निशाणा?
या दोनही घटनांमध्ये एकच गोष्ट सामायिक आहे – पीडित महिला एकाच धर्माच्या आहेत आणि आरोपी दुसऱ्या धर्मातील आहेत. या पाश्वभूमीवर धार्मिक उद्देशाने छळ किंवा टार्गेटिंग होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी अशा घटनांचा गांभीर्याने तपास करून समाजात भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.