WhatsApp

मतांची चोरी थेट उघड! राहुल गांधींचं मोठं सादरीकरण, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत पत्रकार परिषदेत मतांची चोरी असल्याचे ठोस पुराव्यांसह सादर केले. त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्रात ४० लाखांहून अधिक मतं संशयास्पद आहेत. आयोग गप्प का?”



राहुल गांधींचं सादरीकरण:
राहुल गांधींनी फॉर्म ६ चा गैरवापर करत कशा प्रकारे नव्या मतदारांची नोंदणी झाली, याचे उदाहरणांद्वारे स्पष्टीकरण दिलं. शकुन राणी नावाच्या ७० वर्षांच्या महिलेचं नाव दोन वेळा याद्यांमध्ये असल्याचं त्यांनी दाखवलं. दोन्ही वेळा वेगळ्या फोटोसह तिचं नाव दिसतं. यावरून एकाच व्यक्तीनं दोनदा किंवा दुसऱ्याने तिच्या नावावर मतदान केल्याचा आरोप त्यांनी केला.

३३ हजार ६९२ मतदारांची शंका:
राहुल गांधींनी स्पष्ट केलं की, ३३ हजार ६९२ मतदारांच्या नावांमध्ये ९५ ते ९८ वयोगटातील संशयास्पद नोंदी आहेत. एकही नाव वास्तविक वाटत नाही, अशी यादी संपूर्ण खोटी आहे, असा आरोप त्यांनी केला.

बंगळुरू मतांची चोरी:
बंगळुरू लोकसभा मतदारसंघात १ लाख २५० मतांची चोरी झाली असून त्यापैकी ११,९६५ नावं बनावट, ४०,००० पेक्षा अधिक मतदारांचे पत्ते खोटे, तर ४,१३२ चे फोटो चुकीचे असल्याचं राहुल गांधींच्या सादरीकरणात नमूद आहे.

निवडणूक आयोगावर सवाल:
राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर बोट दाखवत विचारलं, “हे सगळं समोर असूनही आयोग शांत का आहे? ही लोकशाहीची हत्या आहे. याचा लढा आम्ही न्यायालयात नेणार.”

Leave a Comment

error: Content is protected !!