अकोला न्यूज नेटवर्क
कानपूर – उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील शिवराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्यांवर विश्वासघात करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अजय सिंह नावाच्या तरुणाच्या अनुपस्थितीत त्याची पत्नी संगीता सिंह हिने १५ लाख रुपयांचे दागिने, रोख रक्कम आणि एकुलता एक मुलगा घेऊन तिच्या प्रियकरासह फरार होण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
गंगास्नानासाठी गेलेला नवरा, उघडं कपाट आणि रिकामं घर
श्रावण महिन्याच्या निमित्ताने अजय सिंह खेरेश्वर घाटावर गंगास्नानासाठी गेला होता. घरात पत्नी संगीता आणि मुलगा एकटे होते. परतल्यावर अजयच्या लक्षात आलं की घराचं दरवाजा बंद आहे. शेजाऱ्यांकडून चौकशी केली असता, पत्नी एका अनोळखी तरुणासोबत घरातून बाहेर पडल्याचं समजलं.

कुलूप तोडलं आणि धक्कादायक सत्य समोर आलं
अजयने काळजीपोटी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाट उघडं होतं, आणि त्यात ठेवलेले मौल्यवान दागिने व रोख रक्कम गायब होती. याशिवाय मुलगाही घरात नव्हता. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बॉयफ्रेंड दीपक कटियारची पोलखोल
अजयने दिलेल्या माहितीनुसार, संगीता हिचे दीपक कटियार नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. अजय कामावर असताना दीपक अनेक वेळा त्यांच्या घरी येत असे आणि संगीता व तो अनेकदा एकत्र बाजारातही दिसले होते. हे संधीचं सोनं करत संगीता व दीपक मिळून हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस तपास सुरू, परिसरात खळबळ
ही घटना समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. महिलांच्या वर्तनामुळे नात्यांवरचा विश्वास ढासळल्याची भावना लोकांमध्ये व्यक्त होत आहे.