WhatsApp

तिन्ही मुलांसमोर बापाची तडफड! आईनेच प्रियकराच्या मदतीने संपवलं आयुष्य

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावच्या आरे कॉलनीत झालेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. ३५ वर्षीय राजश्री अहिरे हिने आपल्या प्रियकर चंद्रशेखरच्या मदतीने पती भरत अहिरे याचा अमानुष मारहाण करून खून केला. या प्रकरणात राजश्रीला पोलिसांनी अटक केली असून तिचा प्रियकर आणि त्याचा साथीदार सध्या फरार आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण कटाची माहिती घरातल्या १३ वर्षीय मुलीच्या जबाबातून उघड झाली.



प्रेमसंबंधातून पतीचा खून, पत्नीचा थंडपणे सहभाग
राजश्री आणि चंद्रशेखर यांच्यातील संबंध उघड झाल्याने पती भरत याने पत्नीला प्रश्न विचारल्यावर वाद उफाळून आला. १५ जुलै रोजी आरे कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाजवळ चंद्रशेखर, त्याचा साथीदार रंगा आणि भरत यांच्यात वाद झाला. चंद्रशेखरने भरतच्या छातीवर व पोटावर अमानुष मारहाण केली, तर रंगाने त्याला मागून पकडून ठेवले. राजश्री घटनास्थळी उपस्थित असूनही तिने हस्तक्षेप केला नाही.

आईच्या थंड डोळ्यांसमोर वडिलांचा मृत्यू; मुलीच्या जबाबाने सत्य बाहेर
भरतला गंभीर दुखापत झाल्यानंतरही राजश्रीने त्याला रुग्णालयात न नेताच घरीच तीन दिवस ठेवले. या दांपत्याला तीन मुले असून, त्यांची मोठी मुलगी सतत वडिलांची तडफड पाहत होती. अखेर रक्ताच्या उलट्या सुरू झाल्यानंतर तिने नातेवाईकांना माहिती दिली. रुग्णालयात भरतने दबावाखाली अपघात सांगितला, मात्र पोलिसांनी चौकशी सुरू करताच मुलीच्या जबाबात सत्य समोर आले. “पप्पाला मारलं जात होतं तेव्हा आई फक्त बघत होती,” असे मुलीने पोलिसांना सांगितले. ५ ऑगस्टला उपचारादरम्यान भरतचा मृत्यू झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!