WhatsApp

सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी! पुणे आणि नागपूरमध्ये लष्करी रॅलीसाठी तयारी पूर्ण

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय लष्कराकडून अग्निवीर आणि नियमित संवर्गासाठी दोन टप्प्यांमध्ये भरती रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून, पुणे आणि नागपूरमध्ये ही रॅली होणार आहे.



भरती रॅलीचे वेळापत्रक जाहीर
पुण्यातील रॅली ९ ते १९ ऑगस्ट २०२५ दरम्यान बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अ‍ॅण्ड सेंटर, दिघी येथे पार पडणार आहे. नागपूरमधील रॅली ३ ते १३ सप्टेंबरदरम्यान अल्बर्ट एक्का स्टेडियम, कामठी येथे होईल. दोन्ही रॅलींसाठी पात्र ठरलेले उमेदवार हे जुलै २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या समायिक प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत.

रॅलीसाठी ई-मेल व संकेतस्थळाद्वारे प्रवेशपत्र उपलब्ध
Join Indian Army संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र त्यांच्या ई-मेलवर पाठवण्यात आले आहे. तांत्रिक अडचणी आल्यास पुणे कॅम्प किंवा कामठी कॅम्पमधील भरती कार्यालयाकडून मदत मिळू शकते.

जिल्हानिहाय पात्र उमेदवारांचा समावेश
पुणे रॅलीसाठी पुणे, सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर रॅलीसाठी नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश आहे.

रॅलीत शारीरिक व वैद्यकीय चाचण्या अनिवार्य
१.६ किमी धावण्याची चाचणी, शारीरिक क्षमता मापन, वैद्यकीय तपासणी अशा अनेक टप्प्यांमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पुणे येथे लष्करी डॉक्टरांचा विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!