WhatsApp

लाडकी बहिणींच्या योजनेत धांदली? ४९ हजार लाभार्थ्यांवर चौकशीचा फास

Share

अकोला न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरवापर समोर आला असून, यवतमाळ जिल्ह्यात तब्बल ४९ हजार ७३५ लाभार्थ्यांवर गृह चौकशीचा फास आवळला आहे. योजनेच्या निकषांना न बसणाऱ्या महिलांनी लाभ घेतल्याचे उघड झाल्याने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.



गैरलाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कडक कारवाई
एकाच घरातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. तसेच २१ वर्षांखालील आणि ६५ वर्षावरील महिलांनी अपात्र असूनही अर्ज सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यातील आर्थिक मदत तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील तब्बल ७ लाखांवर अर्ज दाखल
यवतमाळ जिल्ह्यात ७,१९,८८० अर्ज दाखल झाले होते. यापैकी २७,३१७ अर्ज आधीच बाद करण्यात आले होते. मात्र चौकशीत आणखी अपात्र लाभार्थ्यांची नावे पुढे येत आहेत. योजनेचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत आहे.

चौकशीसाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती
महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव अनुप कुमार यांनी गृह चौकशीचे आदेश दिले असून, ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली आहे. येत्या १० ते १५ दिवसांत चौकशी पूर्ण करावी लागणार आहे.

वय, उत्पन्न, वाहनधारक महिलांची स्वतंत्र छाननी
बनावट कागदपत्रांवर अर्ज करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. लाभार्थी महिलांच्या वयाची पडताळणी करण्यासाठी जन्म दाखले आणि शाळा सोडल्याचा दाखला मागवण्यात आला आहे. दुचाकी वा चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांना देखील योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मदतीचं खातं गोठवलं
चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयित लाभार्थ्यांची खाती गोठवण्यात आली असून, दोषी आढळल्यास योजनेतून कायमस्वरूपी वगळण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!