WhatsApp


चारशे महिलांची निःशुल्क आरोग्य तपासणी; महिला दिनी अ‍ॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे आयोजन

Share

अकोला न्युज नेटवर्क दिनांक ८ मार्च २०२४ :- अकोला, नगरसेविका असताना दिवंगत अ‍ॅड.धनश्री देव अभ्यंकर या जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी महिला सत्कार, महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करत होत्या. त्यांच्या निधनानंतर निलेश देव मित्र मंडळाने त्यांनी सुरु केलेले उपक्रम कायम ठेवले. यंदा देखील जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन निःशुल्क आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनानिमित्त जठारपेठ, न्यू तापडीया नगर, रामदास पेठ, निबंधे प्लाॅट, उमरी परिसरातील सुमारे ४०० महिलांनी आरोग्य तपासणी महाआरोग्य शिबिरात करण्यात आली.त्याच बरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन या निमित्त करण्यात आले. पॅथॉलाजी चाचण्या देखील यावेळी करण्यात आल्या.

यावर्षी श्री.सत्यसाई सेवा संघटना महाराष्ट्र जिल्हा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विविध डॉक्टर्स महिलांच्या आरोग्य शिबिरात उपस्थित होत्या. यावेळी डॉ.मयुरी निखील महाजन, डॉ कल्याणी महल्ले, डॉ.निखील महाजन, डॉ सागर थोटे, डॉ जयश्री तामस्कर, डॉ मेघा जाधव, डॉ.उज्वला मेहरे, डॉ. निखिल लहाने, किशोर जी रत्नपारखी,दिपक देशमुख , लॅपरोस्कॉपी व एन्डोस्कॉपी सर्जन आदींची उपस्थिती होती. उपस्थित डाॅक्टरांनी महिला व लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करत औषधे व इतर आवश्यक सुचना केल्या.ब्लड शुगर,फास्टिंग पोस्टिंग टेस्ट, श्री सत्य साई सेवा संघटना महाराष्ट्र जिल्हा अकोला व निलेश देव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन अ‍ॅड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, तसेच अ‍ॅड.धनश्री देव रुग्ण कल्याण उपकरण बँक तसेच निलेश देव मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे संचालन दिलीप देशपांडे यांनी केले. यावेळी जयंतराव सरदेशपांडे, शैलेश देव, रश्मि देव, मोहन काजळे, भास्करराव बैतवार, रामहरी डांगे, राम उमरेकर, विजय वाघ, शशिकांत हिवरखेडकर, प्रकाश जोशी, राजु कनोजिया,ललन मिश्रा राजु गुल्लनवार, कैलास तिरपुडे,शेगावकर गुरुजी, विशाखा गुल्लनवार, सुधीर मस्के, बबलु तिवारी, रविंद्र मेश्राम सौ सातपुते ताई,सौ.पाटील ,सौ.सोनाली पांडे,सौ.गौरी देव,सौ.स्वाती जोशी,समीक्षा बैतवार, रमाकांत यादव, प्रसाद देशपांडे,सोनु मोटे,दिपकजी शुक्ला, आदींची उपस्थिती होती. *महिला दिनाच्या औचित्य साधून येता रविवारी १० मार्च २०२४ रोजी न्यु तापडिया नगर मध्ये भव्य आरोग्य व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!