WhatsApp

सहावीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू; शाळेच्या गेटमध्येच घडली दुर्दैवी घटना

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नाशिक : हार्ट अटॅकचा फटका आता लहान वयातील मुलांनाही बसू लागला आहे. नाशिकमध्ये सहावीत शिकणाऱ्या श्रेया किरण कापडी या ११ वर्षांच्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेबाहेर सकाळी शाळेत प्रवेश करत असताना घडली.



शाळेच्या गेटमध्येच चक्कर येऊन कोसळली
श्रेया नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत पोहोचली होती. मात्र गेटमधून आत जात असताना अचानक तिला चक्कर आली आणि ती कोसळली. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

हृदयाशी संबंधित आजाराची शक्यता
डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रेयाला पूर्वीपासून हृदयाशी संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे. मात्र, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाल्याचाच प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकी कारणे स्पष्ट होतील.

बालवयात हृदयविकाराचे वाढते प्रमाण चिंताजनक
अलिकडच्या काळात खेळताना, व्यायाम करताना किंवा अगदी शांत अवस्थेत असतानाही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकार वाढले आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष, अन्नाची असंतुलित सवय, जास्त प्रमाणात फास्ट फूड, स्टेस यामुळे लहानग्यांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत.

हृदयविकार टाळण्यासाठी काय टाळावे?
फास्ट फूड, पनीर-बर्गर, मैद्याचे पदार्थ, गॅस-कार्बोनेटेड ड्रिंक, आणि तेलकट पदार्थांचे अति सेवन हृदयावर दुष्परिणाम करते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढून नसा बंद होतात आणि अचानक हार्ट अटॅक येऊ शकतो.

हार्ट अटॅक येण्याचे संकेत ओळखा
हार्ट अटॅक नेहमी अचानक येतो असं नाही. त्याआधी छातीत अस्वस्थता, थकवा, श्वास घेण्यात अडचण, उलटीसारखं वाटणं, आणि डाव्या खांद्यापर्यंत जाणारा वेदनादायक ताण ही काही सामान्य लक्षणं असतात. दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!