WhatsApp

‘निराधार’ ४३ हजार विद्यार्थी! तांत्रिक अडचणींमुळे शिक्षण योजनांवर गंडांतर

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे :
शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड प्रमाणिकरणासाठी २३ जुलै ही अंतिम मुदत जाहीर केली होती. मात्र ही मुदत संपूनही शहरातील तब्बल ४३ हजार ३६८ विद्यार्थी आधारविना ‘निराधार’ राहिले आहेत. तांत्रिक अडचणी, अद्ययावत नोंदींचा अभाव आणि शाळांकडून दिरंगाईमुळे हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे शाळांच्या संचमान्यतेवरही टांगती तलवार आली आहे.



तांत्रिक अडचणी आणि माहिती विसंगतींमुळे खोळंबा
‘स्टुडंट पोर्टल’वर विद्यार्थ्यांची नोंदणी करताना आधार प्रमाणिकरण करताना अनेकदा ओटीपी न येणे, नावात स्पेलिंग फरक, जन्मतारीख जुळत नसणे, संकेतस्थळ हँग होणे अशा तांत्रिक अडचणी येत आहेत. परिणामी अनेक शाळांनी दररोज केवळ दोन-तीनच विद्यार्थ्यांचे आधार अपडेट केले आहेत.

शहरातील विभागनिहाय स्थिती
भोसरी विभागात २१,४२५ आणि आकुर्डी विभागात २१,९४३ विद्यार्थी अद्याप प्रमाणिकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. आकुर्डी विभागातील फक्त ४४ टक्के तर पिंपरीतील ७० टक्के शाळांनीच आधार प्रमाणिकरण पूर्ण केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

अनुदानासाठी आधार अनिवार्य
शासनाच्या शालेय गणवेश, पोषण आहार, मोफत पुस्तके यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आधार प्रमाणित नसलेल्या विद्यार्थ्यांना पुढे कोणत्याही अनुदानाचा लाभ मिळणार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

स्वयंअर्थसहाय्यित व अंशतः अनुदानित शाळांची स्थिती चिंताजनक
अनेक खासगी व अंशतः अनुदानित शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती अद्याप प्रमाणित केलेली नाही. त्यातही काही विद्यार्थी स्थलांतरित झाल्यामुळे प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

संचमान्यता अडचणीत येण्याची शक्यता
शाळांनी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी पूर्ण न केल्यास शिक्षकांचे वेतन अनुदान, शैक्षणिक मान्यता यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने याबाबत सूचना करूनही वेळेत प्रक्रिया न केल्याने शासनाच्या योजनांचा लाभ खोळंबू शकतो.

शासनाची भूमिका स्पष्ट – वेळोवेळी मुदतवाढ दिली, आता कोणतीही सवलत नाही
“पुनःपुन्हा वेळ दिल्यानंतरही काही शाळांनी प्रक्रिया न केल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्वयंअर्थसहाय्यित शाळांना याबाबत सूचना दिल्या असून, आता यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे,” अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!