WhatsApp

कुटुंबातील वादाचा जीवघेणा शेवट! पित्याने दोन चिमुकल्यांना गंगेत फेकले

Share

अकोला न्यूज नेटवर्क
वाराणसी (उत्तर प्रदेश) : पत्नीशी झालेल्या भांडणानंतर संतापलेल्या व नैराश्यग्रस्त झालेल्या पित्याने आपल्या दोन निष्पाप चिमुकल्यांना गंगेत फेकून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वाराणसी जिल्ह्यात घडली. ही घटना बभनपुरा पुलावर गुरुवारी संध्याकाळी घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



भांडणानंतर घर सोडून निघालेला पिता
चांदपूर येथील रहिवासी दुर्गा सोनकर यांचा पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर दुर्गा यांनी आपल्या सात वर्षांच्या संदीप व पाच वर्षांच्या आशिष या मुलांना घेऊन घर सोडले आणि थेट बभनपुरा पुलावर गेले.

गंगेत फेकली दोन्ही मुले, स्वतःही उडी मारली
नदीकाठी पोहचल्यावर त्यांनी आधी दोन्ही मुलांना गंगेत फेकले व त्यानंतर स्वतःही पाण्यात उडी मारली. काही क्षणांतच ही घटना पाहणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि घटनास्थळी खळबळ उडाली.

वडिलांना वाचवण्यात यश, मुलांचा शोध सुरूच
दुर्गा सोनकर यांना मुस्तफाबाद गावाजवळ काही स्थानिकांनी पाण्यातून बाहेर काढले व त्यांचा जीव वाचवण्यात आला. मात्र, दोन्ही मुलांचा काहीही ठावठिकाणा लागत नसून एनडीआरएफच्या पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. अंधारामुळे मोहिम थांबवावी लागली असून, ती पुन्हा पहाटेपासून सुरू करण्यात येणार आहे.

परिसरात हळहळ, चौकशी सुरू
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पती-पत्नीतील वादाचा असा भीषण शेवट पाहून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!