अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. दहावी पास उमेदवारांसाठी सुरक्षा सहाय्यक (Security Assistant) आणि कार्यकारी (Executive) पदांवर थेट भरती केली जाणार असून एकूण 4887 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 जुलै 2025 पासून सुरू झाली असून 17 ऑगस्ट 2025 ही शेवटची तारीख आहे.
दहावी पाससाठी केंद्रात नोकरीची संधी
या भरतीसाठी कोणतीही पदवी किंवा विशेष पात्रतेची गरज नाही. उमेदवार किमान दहावी पास असावा. यामुळे ग्रामीण भागातील व अल्पशिक्षित पण हुशार उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
18 ते 26 वयोगटातील उमेदवार पात्र
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे ठेवण्यात आले आहे. अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयात सूट मिळेल.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सोपी आणि थेट
उमेदवारांना www.mha.gov.in/en/notifications/vacancies या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. याच संकेतस्थळावर भरतीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
फी, परीक्षा आणि निवड प्रक्रिया
महिला उमेदवारांसाठी 550 रुपये, तर पुरुषांसाठी 650 रुपये अर्ज फी आहे. निवड प्रक्रियेमध्ये मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी, कागदपत्रांची पडताळणी व वैद्यकीय तपासणी या टप्प्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत थेट गुप्तचर विभागात काम करण्याची संधी मिळणं ही अनेकांसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. ही नोकरी सुरक्षितता, वेतन व प्रतिष्ठेच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक मानली जाते.