अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारच्या सुमारे ५० लाख कर्मचाऱ्यांसाठी आणि ६२ लाख पेन्शनधारकांसाठी रक्षाबंधनपूर्वी मोठी दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार १५ ऑगस्ट २०२५ रोजी महागाई भत्ता (DA) वाढवण्याची घोषणा करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होणार असून, कर्मचाऱ्यांना मागील महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे.
DA मध्ये ३ ते ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
महागाई निर्देशांकाच्या आधारे केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी DA वाढवते. यावेळी ३ ते ४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळेल.
फिटमेंट फॅक्टरमुळे वेतनात मोठा बदल
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामुळे मूळ पगारात मोठी झपाट्याने वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, सध्याचा मूळ पगार १८,००० असलेल्या कर्मचाऱ्याचा पगार ४४,२८० रुपयांपर्यंत वाढू शकतो.
आठवा वेतन आयोग प्रक्रियेला वेग
सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत असल्याने, आठव्या वेतन आयोगाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जानेवारी २०२५ मध्ये या आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाली असली तरी, अद्याप अध्यक्ष नेमले गेलेले नाहीत. मात्र, सध्या ही प्रक्रिया गतीने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पेन्शनधारकांनाही लाभ होणार
DA वाढ आणि वेतन आयोगाच्या सुधारणा यांचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर पेन्शनधारकांनाही होणार आहे. यामुळे सरकारी सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळेल.