WhatsApp

पेईंग गेस्ट मुलीवर घरमालकाचा बलात्कार; मदतीसाठी लोकेशन शेअर करताच नेटवर्क गायब

Share

अकोला न्यूज नेटवर्क
बंगळुरू : पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एका महाविद्यालयीन मुलीवर घरमालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ माजली असून आरोपी अश्रफ नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.



पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय विद्यार्थिनी दहा दिवसांपूर्वीच अश्रफच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहायला आली होती. सोमवारी रात्री १२.४० वाजता अश्रफ तिच्या खोलीत आला. त्याने “इथे राहायचं असेल तर मला को-ऑपरेट कर, नाहीतर निघून जा,” असे म्हणत लैंगिक संबंधांची मागणी केली. नकार दिल्यावर अश्रफने तिचा हात पकडला, जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि एका वेगळ्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, रात्री १.३० वाजता तिने मैत्रिणींना लोकेशन पाठवून मदत मागायचा प्रयत्न केला, मात्र त्याच वेळी तिचा मोबाईल नेटवर्कबाहेर गेला. काही वेळानंतर, सुमारे २.१५ वाजता अश्रफने तिला परत तिच्या खोलीत आणून सोडलं. त्यानंतर तिने धाडस करून पोलिसांत तक्रार दिली.

ही पहिलीच घटना नाही. महिन्याभरापूर्वी बंगळुरूतीलच एका अन्य PG मुलीवर रवी तेजा रेड्डी नावाच्या घरमालकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. त्याने पीडितेला एका चोरीच्या प्रकरणात ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केला होता.

सतत घडणाऱ्या या घटनांनी बंगळुरूमध्ये PG सुविधा देणाऱ्यांविरोधात अधिक काटेकोर नियमावलीची गरज अधोरेखित झाली आहे. महिलांच्या सुरक्षिततेविषयी मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!