WhatsApp

झारखंडचे दिशा ठरलेले शिबू सोरेन यांचे निधन; राजकीय विश्वात शोककळा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचे आज (४ ऑगस्ट) दिल्ली येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे पुत्र व सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वरून दुजोरा दिला. “आज मी फक्त माझे वडील गमावले नाहीत, झारखंडने त्यांचा एक महान लढवय्या नेता गमावला आहे,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी दुःख व्यक्त केले.



‘दिशोम गुरुजी’ या नावाने ओळखले जाणारे शिबू सोरेन झारखंडच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचे मूळ होते. त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाची स्थापना करून आदिवासींच्या हक्कांसाठी लढा उभारला. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक ऐतिहासिक आंदोलनं घडली. खासदार, केंद्रीय मंत्री आणि तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी झारखंडच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शिबू सोरेन यांनी १९७० च्या दशकात ‘दिकू विरोधी आंदोलन’ घडवून आणत झारखंडमध्ये सामाजिक न्यायाची चळवळ उभी केली होती. झारखंड मुक्ती मोर्चाच्या स्थापनेपासून ते अखेरपर्यंत ते पक्षाचे मार्गदर्शक आणि सर्वोच्च नेते राहिले. त्यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणात एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

झारखंडच्या अनेक नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. राजधानी रांचीसह राज्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!