WhatsApp

रेल्वे सुरक्षेला कंत्राटी कर्मचाऱ्यांमुळे धोका; सुरक्षा आयुक्तांचा गंभीर इशारा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :
रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर इशारा देताना सुरक्षा आयुक्त ए. एम. चौधरी यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामावर चिंता व्यक्त केली आहे. रेल्वेसारख्या अत्यंत संवेदनशील यंत्रणेत अशा पद्धतीने जबाबदारी देणे अत्यंत धोकादायक असून, येत्या काळात या पद्धतीचा आढावा घेऊन ती बंद करावी, असा सल्ला त्यांनी दिला.



२०२४ मध्ये झालेल्या म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस अपघाताच्या चौकशी अहवालात चौधरी यांनी स्पष्ट केले की, अपघात हा यंत्रणाविषयक बिघाडामुळे नव्हे, तर ट्रॅक इंटरलॉकिंग सिस्टिममध्ये समाजकंटकांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे झाला. ११ ऑक्टोबर रोजी कवराईपेट्टई स्थानकावर मालगाडीला बागमती एक्स्प्रेसने जोरदार धडक दिली होती. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले होते.

चौकशीत असे स्पष्ट झाले की, रेल्वेच्या ट्रॅक सिग्नल सिस्टीममध्ये अनधिकृत फेरफार करण्यात आला होता. यंत्रणांवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक ती पातळीची सुरक्षा यंत्रणा नव्हती. ही जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर देणे ही व्यवस्थेतील मोठी त्रुटी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, रेल्वे कर्मचारी संघाचे सरचिटणीस आलोक चंद प्रकाश यांनीही मागणी केली आहे की, रिक्त पदांवर कायमस्वरूपी नियुक्त्या कराव्यात. “रेल्वे आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा खेळ थांबवणं अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या इशाऱ्यांची गांभीर्याने दखल घेऊन धोरणात्मक पातळीवर लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे संकेत या अहवालातून मिळतात.

Leave a Comment

error: Content is protected !!