अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला जिल्ह्यातील मुंडगाव गावात सर्पदंश झाल्याने एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहेय. 55 वर्षीय बेबीनंदा मधुकर वानखडे असे मृत शेकतरी महिलेचं नाव आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास शेतात निंदन करण्यासाठी ‘त्या’ घरून निघाल्या होत्या, वाटेतच त्यांना मण्यार जातीच्या सापाने दंश केला, अन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज मुंडगाव येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार पार पडणार आहे. सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं दुर्दैवी निधन झाले. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मुंडगाव या गावात ही घटना घडलीये.
काही वर्षांपूर्वीच बेबीनंदा यांच्या पती मधुकर वानखडे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर ‘त्या’ स्वतः कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना दोन मुले आहेत, दोन्ही मुलं अविवाहित आहेत. तसेच ते सतत आजारी पण असतात. त्यामुळं बेबीनंदा ही शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करायची. त्या नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जात असताना वाटेतच सर्पदंश झाल्याने त्यांचं दुःखद निधन झालं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याआधीही सर्पदंशामूळ 19 वर्षीय तरुणीचा झाला होता मृत्यू..
अकोल्यातील पळसो बढे गावात सर्पदंश झाल्याने 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होता. घरात गाढ झोपेत असताना या तरुणीला मन्यार जातीच्या सापाने विषारी दंश केला होता. रुपाली गोवर्धन खांडेकर असं या मृत तरुणीचे नाव होत. उपचारादरम्यान रुपालीचा मृत्यू झाला होता. रुपाली घरातील खोलीत गाढ झोपेत असताना तिच्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याची तिला तीव्र जाणीव झाली. त्यानंतर मन्यार या विषारी सापाने तिला दंश केल्यामुळे रूपालीने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला होता.
नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन…
दरम्यान, पावसाळा येताच साप चावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढतात. पावसामुळ सापांच्या बिळात पाणी साचते. त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात व राहण्यासाठी जागा शोधतात. सुरक्षित जागेच्या शोधात अनेकदा साप घरातील कोपऱ्याच्या खोलीत किंवा एखाद्या ठिकाणी आसरा घेत असतात. अशावेळी अनावधानाने आपण तिथे जातो आणि साप चावतो. गेल्या पंधरा दिवसात सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन केलेये.
