WhatsApp

आजपासून पेट्रोल-डिझेल दरात बदल, तुमच्या जिल्ह्यातील किंमत किती?

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई :
महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम म्हणून इंधन दर स्थिर किंवा काही प्रमाणात कमी झाले आहेत. दररोज सकाळी ६ वाजता देशभरात नवीन दर लागू होतात.



राज्यातील प्रमुख शहरांपैकी मुंबईत पेट्रोलचा दर १०३.५० रुपये आणि डिझेलचा दर ९०.०३ रुपये इतका आहे. याउलट लातूर, परभणी, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा दर १०५.५० रुपये आणि डिझेलचा दर ९२.०३ रुपये इतका उच्च आहे. पुणे, ठाणे, रायगडसारख्या शहरांमध्ये पेट्रोल दर १०३.८२ ते १०३.९६ रुपयांच्या दरम्यान असून डिझेल ९०.३५ ते ९०.४६ दरम्यान आहे.

याशिवाय नागपूर (१०४.१६ रुपये), नाशिक (१०४.७४ रुपये), औरंगाबाद (१०४.५३ रुपये), अमरावती (१०४.९४ रुपये), कोल्हापूर (१०४.१८ रुपये) अशा शहरांमध्ये दर स्थिर आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा दर १०४ ते १०५ रुपयांच्या दरम्यान असून डिझेल ९० ते ९२ रुपयांच्या रेंजमध्ये आहे.

इंधनदर हे केंद्र शासनाच्या कररचनेनुसार ठरत नसून, स्थानिक वॅट, ढोबळ वाहतूक खर्च आणि डीलर मार्जिनवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक शहरात किंमतीत फरक दिसतो.

Watch Ad

दर कसे तपासाल?
इंधन कंपन्यांनी ग्राहकांसाठी SMS सेवाही उपलब्ध करून दिली आहे. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP<डीलर कोड> हा मेसेज 9224992249 या क्रमांकावर पाठवू शकतात. HPCL चे ग्राहक HPPRICE <डीलर कोड> हा मेसेज 9222201122 वर पाठवावा. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> असा मेसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवून दर तपासू शकतात.

सध्या भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांवर नियंत्रण नसल्याने दररोजचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार बदलतात. त्यामुळे नागरिकांनी नियमित दर तपासणे आणि वाहतुकीसाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!