WhatsApp

पतीला करंट देऊन ठार केलं, मृतदेहाशेजारी प्रियकरासोबत संबंध

Share

अकोला न्यूज नेटवर्क
समस्तीपूर (बिहार) | बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील रघुकंठ गावात अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. एका महिलेनं आपल्या पतीचा खून करून त्याच्याच मृतदेहासमोर प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवले. ही घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख सोनू कुमार (वय अंदाजे ३०) अशी असून, आरोपी पत्नीचे नाव स्मिता झा आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली असून, तिचा प्रियकर हरिओम सध्या फरार आहे.



पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनू कुमार हा ऑटो रिक्षा चालवत होता. ६ वर्षांपूर्वी त्याचे स्मिता हिच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांमध्ये सतत भांडणं सुरू असायची. काही वेळा पंचायतीपर्यंत हे वाद पोहोचले होते. या दरम्यान स्मिता झा हिची ओळख हरिओम नावाच्या एका शिक्षकाशी झाली, जो त्यांच्या मुलांना ट्युशन शिकवण्यासाठी घरी येत होता. हळूहळू त्यांचं संबंध अनैतिक वळण घेत गेले.

शुक्रवारी रात्री १२ वाजता सोनू कामावरून घरी परतला. घरातील इतर सदस्य झोपेत असताना, त्याने आपल्या पत्नीला व हरिओमला खोलीत अश्लील अवस्थेत पाहिले. रागाने त्याने दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र त्यावेळी सोनू नशेत असल्याने स्मिता आणि हरिओम यांनी मिळून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी आधी काठी आणि केटलने मारहाण केली आणि नंतर विजेच्या तारेने गळा आवळला. खात्री करण्यासाठी त्याला विजेचा शॉकदेखील दिला.

या अमानुषतेनंतर स्मिता आणि हरिओमने सोनूच्या मृतदेहाजवळच शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक कबुली पोलिस चौकशीत समोर आली आहे. नंतर स्मिताने बनावट आरडाओरड करत मृत्यूचा अपघात असल्याचे नाटक रचले. मात्र सकाळी सोनूच्या वडिलांनी त्याच्या गळ्यावरच्या निशाणांकडे लक्ष दिले आणि लगेचच पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी त्वरित स्मिता झा हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. स्मिता आणि हरिओमचा संबंध मागील अनेक महिन्यांपासून सुरू होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्मिता झा हिला अटक केली असून हरिओमचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे समस्तीपूर परिसरात संतापाची लाट उसळली असून स्थानिकांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. मृत सोनूच्या नातेवाईकांनीही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!