अकोला न्यूज नेटवर्क
अकोला : फिर्यादी नामे संजय सदाशिव रोहणकार, व आरोपी नामे पंकज हरिदास पैठणकर एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत असुन त्यांच्यामध्ये सलोख्याचे व चांगले मित्रत्वाचे संबंध होते. फिर्यादि यांच्याकड़े २०१४ साली वाळू विक्री चा शाशन कंत्राट होता व आरोपीचा फेब्रिकेशन व बिल्डिंग मटेरियल सप्लायचा व्यवसाय करत होता. आरोपी हा फिर्यादि कडून वाळू उधारी घेत होता व बाजार प्रथेनुसार आरोपी व फिर्यादि हे दर रविवारी हिशोब करून पैश्याची देवाण घेवाण करत होते. सर्व हिशोबअंती आरोपी कडून फिर्यादिला एकूण रक्कम रु. 40,000/- रु. घेणे होते. आरोपिने फिर्यादि यांना कायदेशीर देय असलेल्या रक्कम पोटी 20,000/-रु. चे दोन धनादेश आरोपीने स्वत:ची सही करून दिला. धनादेश देते वेळी आरोपीनी तो वटवून देण्याची हमी दिली होती.
सदरचा धनादेश फिर्यादि याने आपल्या बँकेत वटविन्या करिता लावला असता दोन्ही धनादेश पुरेश्या निधी अभावी न वटता “फंडस इनसफिशियंन्ट” या शे-या सह परत आला. आरोपीने कायदेशिर देणे असलेल्या रक्कमेपोटी दिलेला धनादेश न वटविता परत आला म्हणून फिर्यादि याने आरोपीला आपल्या वकीला मार्फत कायदेशिर नोटीस रजि, पोस्टाने पाठवून चेकच्या रक्कमेची मांगणी नोटीस मिळाल्या पासून 15 दिवसाचे आत केली, आरोपीला नोटीस प्राप्त होवून सुध्दा त्यांनी फिर्यादिला चेकची रक्कम दिली नाही व नोटीस ला उत्तर सुद्धा दिले नाही. आरोपीला नोटीस मिळून सुध्या त्यानी चेकची रक्कम न दिल्यामुळे फिर्यादि यानी दोन्ही धनादेशावर दोन फिर्याद प्रकरण विद्यमान कोर्टात दाखल करण्यात आले, आरोपींना कायदेशिर देणे असलेल्या रक्कमेपोटी चेक देवून तो वटवून न देता, अनादरित करुन घेतला तसेच कायदेशिर नोटीस प्राप्त होवूनही चेकची रक्कम दिलेली नाही माणून आरोपीने एन. आय. अॅक्टचे कलम 138 अन्वये गुन्हा केला असल्याने फिर्यादि यांनी न्यायालयात न्यायोचित दाद मागितली.
दोन प्रकरणा पैकी 1 प्रकरणात वि. 7वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री डी. डी. फुलझेले यांच्या समक्ष युक्तिवाद झाले युक्तिवाद एकल्या नंतर दि. २९/०७/२०२५ रोजी आरोपी पंकज हरिदास पैठणकर यांना दोषी मानत वि. न्यायालयाने आरोपी ला 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व धनादेशाच्या रकमेची दुप्पट रक्कम म्हणजेच रक्कम रु. 40,000/- दंड म्हणून थोटावली व दंड न भरल्यास तीन महिन्याचा सादा करावासाची शिक्षा सुनावली. फिर्यादि तर्फे त्यांची बाजू अँड. धीरज मोहन शुक्ला यांनी सक्षमपणे मांडली. सदर आरोपीस वि. 7वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री डी. डी. फुलझेले यांनी शिक्षा सुनावली.
णा पैकी 1 प्रकरणात वि. 7वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री डी. डी. फुलझेले यांच्या समक्ष युक्तिवाद झाले युक्तिवाद एकल्या नंतर दि. २९/०७/२०२५ रोजी आरोपी पंकज हरिदास पैठणकर यांना दोषी मानत वि. न्यायालयाने आरोपी ला 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व धनादेशाच्या रकमेची दुप्पट रक्कम म्हणजेच रक्कम रु. 40,000/- दंड म्हणून थोटावली व दंड न भरल्यास तीन महिन्याचा सादा करावासाची शिक्षा सुनावली. फिर्यादि तर्फे त्यांची बाजू अँड. धीरज मोहन शुक्ला यांनी सक्षमपणे मांडली. सदर आरोपीस वि. 7वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री डी. डी. फुलझेले यांनी शिक्षा सुनावली.