WhatsApp


दुचाकीवर तीबलसीट जाणे जीवावर बेतले दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात तीन जखमी तीन ठार

Share

अकोला न्युज नेटवर्क दिनांक ४ मार्च २०२४ :- वाडेगाव बाळापूर रस्त्याव आज सायंकाळच्या सुमारास भीषण आघात घडला असून या अपघातात तीन जण जागीच ठार झाले दोन दुचाकी व ट्रकच्या विचित्र अपघात होऊन ही घटना घडली असल्याची प्रथम दर्शनीय माहिती समोर येत आहे.

सुसाट रस्ते आणि वाढते अपघात नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत अशाच ऐका अपघातात गतिरोधकावरून गाडी उसळून एका युवतीला आपल्या प्राणास मुकावे लागले दोन दिवसान पूर्वीच या तरुणीचा मृत्यू झाला आज सायंकाळच्या सुमारास याच वाडेगावं बाळापूर रोड वर असाच ऐक अपघात घडला या अपघात तीन जणांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. प्रथम दर्शनीय मिळालेल्या माहिती नुसार तीन युवक हे आपल्या मोटर सायकल वर तीबलसिट वाडेगावं रस्त्यावरून बाळापूर कडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरा समोर धडक झाली दोन्ही दुचाकी वर तीबलसीट जात असल्याची माहिती प्राप्त होत आहे. अपघात होताच गाडीवरील युवक हे रस्त्यावर पडले व मागून येणाऱ्या ट्रकने यातील तीन युवकांना चिरडले असता त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की ट्रक ने चिरडणाऱ्या तिघांच्या अवयवांचा रस्त्यावर सडा पडला होता

तर दुसऱ्या दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच वाडेगावं पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना तत्काळ अकोला येथील सरोपचर रुग्णालय येथे पाठविले अधिक तपास केला असता जखमी असलेले सक्षम शिरसाठ व प्रणव शिरसाठ दोघे हे वाडेगावं जवळील खिरपुरी येथील रहिवासी असून देवेंद्र महुरे हा राहणार जलगाव खानदेश येथील आहे हे तिघे दिग्रसला कामानिमित्त जात होते त्यांच्यावर अकोला येथील सरोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहे..

ज्या तिघांचा मृत्यू झाला ते बाळापूर येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त होत असून पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शेख सादीक शेख रज्जाक 45 शेख खालीद शेख रज्जाक 40 शेख माजीद शेख सादीक 24 तिघे ही राहणार रा बाळापूर येथील आहेत अधिक तपास वाडेगावं पोलीस करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!