WhatsApp


जीवन साथी शादी डॉट कॉमला गुगल प्ले स्टोअर ने दिली फारकाती नोकरी डॉट कॉम सह हतबल हे ॲप

Share

अकोला न्युज नेटवर्क दिनांक २ मार्च २०२४ :- भारतातील काही Apps वर गुगलने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने Shaadi.com, Naukri.com सह अनेक महत्वाचे अँप्स Android Play Store वरून हटवले आहेत. शुल्काच्या वादावर गुगलने ही कारवाई केली आहे.

याबाबत गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की, या ॲप्सचे डेव्हलपर बिलिंग पॉलिसीचे पालन करत नाहीत. त्यांना यापूर्वी अनेकदा इशारा सुद्धा देण्यात आला होता. मात्र त्यांनी पालन न केल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली आहे.

गुगलने जी काही अँप्स प्ले स्टोअर वरून हटवली आहेत त्यामध्ये Kuku FM, Bharat Matrimony, Shaadi.com, Naukri.com, 99 acres, Truly Madly, Quack Quack, Stage, ALTT (Alt Balaji) आणि इतर दोन ॲप्सचा समावेश आहे. त्यामुळे हे अँप्स वापरणाऱ्या यूजर्स साठी निराशाजनक बातमी म्हणावी लागेल.

कंपनीने म्हंटल आहे कि, प्ले स्टोअर वरून काढून टाकलेले ॲप्स इतर ॲप स्टोअरच्या धोरणांचे पालन करत आहेत परंतु त्यांना Google च्या धोरणामध्ये त्यांना काही समस्या आहेत. गुगलने सांगितले की, दोन लाखांहून अधिक भारतीय डेव्हलपर्स गुगल प्ले स्टोअरचा वापरत आहेत आणि त्यांचे ॲप्स प्ले स्टोअरवर पब्लिश सुद्धा झाले आहेत. सर्व डेव्हलपर्स साठी गुगलचे एकच धोरण आहे पण काही डेव्हलपर्स ते मान्य करायला तयार नाहीत. गुगलने या ॲप्सना तीन वर्षांचा वेळही दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले. यामध्ये गुगलला हिरवा सिग्नल मिळाला असून ॲप्सला कोणताही दिलासा दिला नाही. अखेर गुगलने या ठराविक अँप वर कारवाई करत जोरदार दणका दिला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!