WhatsApp

Google Pay, PhonePe वापरताय? आता दिवसातून फक्त ‘इतक्याच’ वेळा पाहता येणार बँक बॅलन्स, नवा नियम लागू!

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | तुम्ही जर Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) १ ऑगस्ट २०२५ पासून UPI संबंधित काही नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाइन पेमेंट अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.



काय आहे नवा नियम आणि कशासाठी?

या नव्या नियमांनुसार, कोणताही UPI वापरकर्ता आता दिवसातून केवळ २५ वेळा आपले लिंक केलेले बँक खाते पाहू शकणार आहे. त्याचबरोबर बँक बॅलन्स तपासण्याची मर्यादाही निश्चित करण्यात आली असून, वापरकर्ता जास्तीत जास्त ५० वेळा आपला बॅलन्स तपासू शकणार आहे. याशिवाय, जर तुम्हाला एखाद्या व्यवहाराची (ट्रान्झॅक्शन) स्थिती जाणून घ्यायची असेल, तर आता तुम्ही दिवसातून फक्त ३ वेळाच त्याचे स्टेटस तपासू शकता आणि तेही प्रत्येक वेळी ९० सेकंदांच्या अंतराने. म्हणजेच, वारंवार ट्रान्झॅक्शन स्टेटस जाणून घेण्यासाठी तुम्ही ॲप रिफ्रेश करू शकणार नाही.

NPCI चे म्हणणे आहे की, एप्रिल ते मे २०२५ या कालावधीत व्यवहारात बिघाड आणि विलंबाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. वापरकर्त्यांकडून वारंवार बॅलन्स चेक आणि सतत ट्रान्झॅक्शन स्टेटस ट्रॅकिंगमुळे सिस्टीमवर प्रचंड ताण पडत असल्याचे तपासात समोर आले. यामुळे अनेकवेळा पेमेंट फेल होत होते किंवा खूप उशीर होत होता. या मर्यादांमुळे सिस्टीमवरील भार तर कमी होईलच, शिवाय पेमेंटचा वेगही सुधारेल आणि वापरकर्त्याला सहज अनुभव मिळेल.

हे नवे नियम UPI च्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं पेमेंट स्वीकारणाऱ्या किंवा पाठवणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना लागू होतील. त्यामुळे, १ ऑगस्टपासून होणाऱ्या या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार UPI वापरण्याचे आवाहन NPCI ने केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!