WhatsApp

नात्यातच अनैतिक संबंध अन् निष्पाप मुलांचे बळी; दीड वर्षात सोलापूर जिल्ह्यात ३ घटना

Share

अकोला न्यूज नेटवर्क
सोलापूर |
जन्मदात्यांनीच आपल्या पोटच्या मुलांचा जीव घेतल्याच्या थरारक घटना मागील दीड वर्षात सोलापूर जिल्ह्यात समोर आल्या आहेत. आई किंवा वडिलांचे अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीपोटी आपल्या लहानग्या मुलांचा निर्दयी खून करण्यात आला. एकीकडे कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी प्रपंच चालवायचा, तर दुसरीकडे वासनांधतेला आंधळं होऊन अगदी चिमुकल्यांचाही बळी देण्यास मागेपुढे न पाहणाऱ्या विकृत मानसिकतेचे हे गंभीर दर्शन घडवणारे प्रकार ठरले आहेत.



घटना १ : वडिलांनी मुलीचा खून केवळ आईसोबतचं अफेअर उघड होऊ नये म्हणून
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावातील घटनेत आठ वर्षाची मुलगी आपल्या आजोबांजवळ झोपली होती. रात्री तिने उठून वडिलांच्या खोलीचा दरवाजा उघडला असता, तिच्या डोळ्यांसमोर वडील आणि आजी एकाच अंथरुणात आक्षेपार्ह अवस्थेत होते. वडिलांना भीती वाटली की मुलगी हे कुणाला तरी सांगेल, म्हणून त्यानेच तिचा गळा दाबून निर्दयी खून केला. याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपी तुरुंगात आहे.

घटना २ : आईने आपल्या सहा वर्षांच्या मुलाचं मुंडकं केलं धडावेगळं
माढा तालुक्यातील कव्हे गावातील विवाहितेचं एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. सहा वर्षांच्या मुलाने माहेरी आईला त्या अवस्थेत पाहिलं. आईला वाटलं की मुलगा हे वडिलांना सांगेल. त्यामुळे ती विवाहित महिला आपल्या लहान मुलाला घेऊन शेतात गेली, त्याचा गळा दाबून त्याचा जीव घेतला. इतक्यावरच न थांबता तिने कुऱ्हाडीने त्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. नंतर आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. सध्या ती महिला तुरुंगात आहे.

घटना ३ : चुलतीचा पुतण्यासोबत संबंध; पाहिलं म्हणून १० वर्षीय मुलाचा खून
माढा तालुक्यातील तिसऱ्या घटनेत, विवाहितेने आपल्या दिराच्या २५ वर्षीय मुलासोबत अनैतिक संबंध सुरू केले. घरातच हे अफेअर सुरू होते. परंतु एकेदिवशी तिच्या १० वर्षांच्या मुलाने आई आणि चुलत भावाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. हे प्रकरण उघड होण्याआधीच त्या तरुणाने साथीदारांच्या मदतीने मुलाचा खून केला. या प्रकरणाचा तपास टेंभुर्णी पोलीस करत आहेत.

या तिन्ही घटनांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. पोटच्या गोळ्यांचा इतक्या अमानुषपणे बळी घेतला जातो, याचे चित्र समाजमनावर गारठा निर्माण करणारे आहे. अनैतिक संबंधातून वाढलेली हिंसा, कुटुंबातील घातक विकृती आणि मूल्यांची ढासळती रेषा यामुळे आता “विश्वास ठेवायचा तरी कोणावर?” हा प्रश्न अधिक गडद होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!