WhatsApp


शेगावच्या गजानन महाराजांचा १४६वा प्रकटदिन, भक्तांसाठी दोन दिवस मंदिर खुले जाणून घ्या सविस्तर…

Share

अकोला न्युज नेटवर्क दिनांक १ मार्च २०२४ :- विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा श्री. संत गजानन महाराज यांच्या १४६वा प्रकटदिन उत्सव येत्या ३ मार्च रोजी संतनगरीत भव्य प्रमाणात सालाबादप्रमाणे साजरा होत आहे. संत नगरीमध्ये उत्साहाच्या निमित्ताने २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत राज्यभरातून ४५० भजनी दिंड्यांचे आगमन झाले आहे. दररोज शहरात भजनी दिंड्या दाखल होत आहेत. टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमन गेली आहे. श्रींच्या प्रकट दिन उत्सवात श्रींचे मंदिर २५ फेब्रुवारीपासून महारुद्र स्वाहाकाराने सुरुवात झाली.

या निमित्ताने दररोज मंदिरामध्ये काकड भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. उत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून ठिकठिकाणी भजनी दिंड्या संत नगरीमध्ये २५ फेब्रुवारीपासून दाखल होत आहेत. २९ फेब्रुवारी सायंकाळपर्यंत ४५० भजनी दिंड्यांचे आगमन झाले आहे. दिवस रात्र भजनी दिंड्यांची ये-जा सुरू असून श्री. संस्थानकडून विसावा भक्त निवास संकुल परिसरात टेंट उभारून या भगिनी दिंड्यांची नोंदणी तसेच नियमांची पूर्तता करणाऱ्या भजनी दिंड्यांना टाळ, मृदुंग, विना व इतर भजनी साहित्य वितरण केले जात आहे. भजनी दिंड्यांमधील सर्व वारकरी भाविक भक्तांची सर्व व्यवस्था तसेच त्यांना महाप्रसाद वितरण श्री संस्थांकडून करण्यात येत आहे.

३ मार्च रोजी श्रींचे मंदिरामध्ये सकाळी १० वाजता पूर्ण होती. तर नंतर १० ते १२ श्रींचे शेगाव प्रगट दिननिमित्त कीर्तन पार पडेल. त्यानंतर दुपारी ४ वाजता श्रींची पालखी परिक्रमा मंदिरमधून शहरातील परिक्रमा मार्गाने निघेल. सायंकाळी ही परिक्रमा संपवून पालखी परत मंदिरात पोहचेल. मंदिरात महारथी व वारकऱ्यांचा नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडेल. त्यानंतर पालखी परिक्रमाची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ मार्च रोजी सकाळी ७ ते ८ काल्याचे किर्तन आणि श्रींच्या प्रकटदिन उत्सवाची यशस्वीपणे सांगता होईल. प्रकटदिनाच्या निमित्ताने देशभरातून श्री. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी होणारी भाविक भक्तांची गर्दी लक्षात घेऊन भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी श्री. संस्थानकडून प्रकटदिनाचे आदल्या दिवशी म्हणजे २ मार्च रोजी तसेच प्रकटदिनाच्या दिवशी ३ मार्च रोजी गर्दी संपेपर्यंत श्रींचे मंदिर भाविक भक्तांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवणार जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!