WhatsApp

लग्न झाल्यावरही बेवफाई! ‘या’ शहरात सर्वाधिक अफेअर्स, मुंबई गडगडली

Share

मुंबई : विवाह्यबाह्य संबंधांमध्ये भारतातील ‘Ashley Madison’ डेटिंग प्लॅटफॉर्मने नुकताच 2025 चा अहवाल प्रसिद्ध केला असून, या अहवालाने समाजमनात एकच खळबळ उडवून दिली आहे. या अहवालानुसार, तमिळनाडूमधील कांचीपुरम हे सांस्कृतिक महत्त्व असलेले शहर देशातील सर्वाधिक विवाह्यबाह्य संबंध असणारे शहर ठरले आहे. गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचे या वर्षी टॉप-20 यादीतही नाव नाही. याउलट पुणे आठव्या स्थानावर आहे.



Ashley Madison या आंतरराष्ट्रीय डेटिंग प्लॅटफॉर्मवर भारतातून नोंदणी करणाऱ्यांच्या आकड्यावर आधारित ही यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये कांचीपुरम पहिल्या स्थानावर पोहोचले असून, मागील वर्षी हे शहर 17 व्या क्रमांकावर होते. यंदा दिल्ली एनसीआरमधील तब्बल नऊ क्षेत्रांनी यादीत स्थान मिळवले आहे, यामध्ये सेंट्रल दिल्ली (2), गुरुग्राम (3), गौतमबुद्धनगर (4), साउथ वेस्ट दिल्ली (5) आघाडीवर आहेत.

टॉप-20 शहरांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

  1. कांचीपुरम
  2. सेंट्रल दिल्ली
  3. गुरुग्राम
  4. गौतमबुद्धनगर
  5. साउथ वेस्ट दिल्ली
  6. देहरादून
  7. ईस्ट दिल्ली
  8. पुणे
  9. बेंगळुरू
  10. साउथ दिल्ली
  11. चंदीगढ
  12. लखनऊ
  13. कोलकाता
  14. वेस्ट दिल्ली
  15. कामरूप (आसाम)
  16. नॉर्थ वेस्ट दिल्ली
  17. रायगड
  18. हैदराबाद
  19. गाझियाबाद
  20. जयपूर

विशेष म्हणजे, मुंबईने 2024 मध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं, मात्र यंदा ती यादीतून पूर्णपणे गहाळ आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिल्लीचा दबदबा मात्र यंदाही कायम राहिला आहे.

कायद्याचा संदर्भ:
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 497 ला असंवैधानिक ठरवत, दोन प्रौढांमधील सहमतीने असलेले विवाह्यबाह्य संबंध गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हे संबंध घटस्फोटाचे कारण होऊ शकतात आणि कोर्टात मानसिक क्रूरतेचा भाग मानले जाऊ शकतात. त्यामुळे कायद्याने या संबंधांना मुभा असली, तरी सामाजिकदृष्ट्या आणि कौटुंबिक पातळीवर त्याचे परिणाम गंभीर असतात.

तज्ज्ञांचे निरीक्षण:
Ashley Madison चे मुख्य धोरण अधिकारी पॉल कीएबल यांनी नमूद केलं आहे की, “भारतामध्ये आता विवाह्यबाह्य संबंध लपवण्याची गोष्ट राहिलेली नाही. अनेक विवाहित व्यक्ती केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिक रिकामेपणा भरून काढण्यासाठी अशा नात्यांकडे वळतात.” तज्ज्ञांच्या मते, व्यस्त जीवनशैली, ताणतणाव, डिजिटल सवयी, वैवाहिक दुरावा आणि आत्मसमज यामुळे विवाह्यबाह्य संबंधांचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

कौटुंबिक परिणाम गंभीर:
तज्ज्ञांच्या मते, अशा नात्यांचा सर्वाधिक फटका मुलांवर होतो. घरातील वातावरणात निर्माण होणारा तणाव, वडीलधाऱ्यांचे विभक्त होणे किंवा सततचे वाद हे मुलांच्या मानसिक आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात. यामुळे अनेक पालकत्वाच्या जबाबदाऱ्यांवरही परिणाम होतो.

डिस्क्लेमर:
वरील माहिती सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून, वाचकांनी ती वैयक्तिक विवेकबुद्धीने स्वीकारावी. आम्ही या आकडेवारीची पुष्टी करत नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!