WhatsApp

बहिण लॉजवर मित्रासोबत, भावाने रंगेहाथ पकडलं, घाबरुन तरुणीची उडी, मित्राला भोसकलं

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नांदेड |
जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आपापल्या मित्रांसोबत लॉजवर गेल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यातील एका तरुणीच्या अल्पवयीन भावाला बहिणीबाबतची माहिती मिळताच तो दोन मित्रांसह तामसा रोडवरील गारवा लॉजवर पोहोचला आणि मोठा वाद झाला.



भावाने बहिणीला एका खोलीत मित्रासोबत रंगेहाथ पकडल्यावर ती घाबरून पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळाली. या उडीत तिचा हात मोडला. त्याच दरम्यान, भावाने मित्रांसोबत मिळून तरुणाला लॉजमधून ओढून बाहेर काढलं आणि भोकर फाट्याजवळ नेऊन खंजराने पोटात भोसकलं. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात, तर तरुणीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून महाविद्यालयीन मुलींमध्ये काय सुरू आहे यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार तिघा तरुणांनी बळजबरी लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप करत अ‍ॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, जखमी तरुणाने अल्पवयीन भावासह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्पष्ट केले असून, या घटनेने नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!