WhatsApp


खंडर झालेल्या घराला लागली आग नागरिकांचा जीव धोक्यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही

Share

रविवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यात जुने शहर स्थित शिवचरण पेठ येथील पडिक घराला आग लागल्याची घटना घडली अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने पुढील मोठा अनर्थ टळला

अकोला शहरात बऱ्याच परिसरात खंडर झालेले पडिक घरे असून हे घरे आस पास असल्या नागरिकांचा जीवाला धोका निर्माण करीत आहेत जुने शहर शिवचरण पेठ येथील चैतान्य नगर येथे अशीच एक घटना घडली रविवारी सकाळच्या सुमारास येथील एका पडिक घराला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाला मिळताच अग्निशम दल घटनास्थळी दाखल झाले मात्र ज्या घराला आग लागली तेथील गल्ल्या या अगदीच बारीक असल्याने अग्निशम दलाच्या कर्मचाऱ्यांना चांगलीच मशगत करावी लागली अखेर कसे बसे आग लागली त्या स्थळी पोहोचून आगी वर नियंत्रण प्राप्त केले घर जरी पडके होते जीवित हानी झाली नसली तरी मात्र या घराच्या आगीमुळे आस पासच्या घरांना धोका निर्माण झाला होता  

Leave a Comment

error: Content is protected !!