WhatsApp

खोटं आयडी, चार स्टार आणि प्रेमाचा बहाणा… बनावट पोलिसाचं अखेर पितळ उघडं!

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मेरठ :
उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंचोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका विधवा महिलेला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक इतकीच सामान्य नाही, कारण आरोपी शुभम राणा हा खऱ्या पोलिसासारखा गणवेश परिधान करून महिलेला भेटायला यायचा. पोलिस असल्याचं भासवत महिलेशी संबंध ठेवणाऱ्या या बनावट पोलिसाच्या कारनाम्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.



ही संपूर्ण घटना इंचोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर तिची ओळख मुजफ्फरनगरमधील शुभम राणाशी झाली. प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर शुभम नेहमीच महिलेला भेटायला येत असे. मात्र, कोणालाही संशय येऊ नये म्हणून तो पोलिसाचा गणवेश परिधान करून तिच्या घरी येत असे. यावेळी त्याने स्वतःला ग्रेटर नोएडाचा पोलीस अधिकारी असल्याचं भासवलं.

शुक्रवारीही तो महिलेला भेटायला आला होता. पण यावेळी महिलेच्या सासरच्यांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी तातडीनं स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभमला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने कबूल केलं की, तो पोलीस नाही आणि त्याने प्रेमसंबंध टिकवण्यासाठी खोटं पोलीस असल्याचं सांगितलं होतं.

त्याच्याकडून खोटं ओळखपत्र, चार स्टार आणि पोलिसांच्या वर्दीतले फोटो जप्त करण्यात आले आहेत. एसएसपी विपिन ताडा यांनी सांगितलं की, महिलेसोबत नातं टिकवण्यासाठी शुभमकडून पोलिसी अधिकार्‍याचं नाटक करण्यात आलं होतं. आता त्याच्यावर बनावट ओळखपत्र आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!