WhatsApp

एकट्यानेच चालायचं ठरवलं… ‘आप’ने आघाडी फोडली?

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली |
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (आप) ‘इंडिया’ आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील विरोधकांच्या संभाव्य एकजुटीला मोठा धक्का बसला आहे. ‘आप’ने स्पष्ट केले की, ही आघाडी केवळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित होती आणि आता ती त्यांच्यासाठी संपुष्टात आली आहे.



आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही लोकसभा निवडणुकीनंतरच्या सर्व विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढल्या आहेत. त्यामुळे ‘आप’ सध्या ‘इंडिया’ आघाडीचा घटक नाही. आम्ही सशक्त विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहू, पण कोणत्याही आघाडीचा भाग राहणार नाही, असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

या निर्णयामुळे इंडिया आघाडीत एकप्रकारे फूट पडली असून, विरोधकांच्या एकजुटीविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी अनेक मुद्द्यांवरून आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद दिसून आले होते, मात्र ‘आप’ने थेट बाहेर पडण्याची घोषणा करत हे मतभेद उघड केले आहेत.

संजय सिंह यांच्या वक्तव्यानंतर अन्य घटक पक्षांची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः काँग्रेस आणि टीएमसीसारखे मोठे पक्ष ‘आप’च्या या भूमिकेवर काय प्रतिक्रिया देतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!