WhatsApp

मुख्यमंत्रींचा दिव्यांगांसाठी मोठा निर्णय, अनाथ विद्यार्थ्यांनाही शिक्षणात मोठी सवलत

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
अकोला |
राज्य सरकारने दिव्यांगांसाठीच्या दरमहा मिळणाऱ्या आर्थिक मदतीत मोठी वाढ जाहीर केली आहे. आतापर्यंत १,५०० रुपये मिळणारे अनुदान आता २,५०० रुपयांवर नेण्यात आले आहे. ही घोषणा सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री अतुल सावे यांनी विधिमंडळात केली. यामुळे राज्यातील लाखो दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा १००० रुपयांची अधिक मदत मिळणार आहे.



तीन योजनांचे लाभार्थी होणार थेट लाभार्थी
या निर्णयाचा थेट फायदा संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवण बाळ सेवा योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना होणार आहे. हे लाभ शासनाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. शासनाने यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे.

अनाथ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे मोफत
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. ज्या अनाथ विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून लागू करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना सवलतीचा लाभ
राज्यभरातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालये, विद्यापीठे आणि तंत्रनिकेतनांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना CAP (Centralized Admission Process) द्वारे प्रवेश घेतल्यास ही सवलत मिळणार आहे. संस्थास्तरावर झालेल्या प्रवेशांना ही सवलत लागू होणार नाही.

Watch Ad

शिक्षण पूर्ण होईपर्यंत सवलत कायम, दुहेरी लाभ नाकारला
एकदा सवलत मंजूर झाल्यानंतर ती त्यांच्या संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत लागू राहील. मात्र, विद्यार्थ्यांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येईल. शिष्यवृत्ती आणि शुल्क सवलत दोन्ही एकत्र मिळणार नाहीत. संस्थांनी आवश्यक सुविधा आणि शुल्क सवलती विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय, १% सामाजिक आरक्षणही अनाथ विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!