अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला | प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगाम २०२५-२६ साठी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांनी विविध पिकांमध्ये घेतलेल्या उत्पादनाची गुणवत्ता आणि त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन अधोरेखित करणे हा आहे.
📋 कोण सहभागी होऊ शकतो?
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन असणं आवश्यक आहे. संबंधित पिकाची किमान ४० आर (१००० स्क्वेअर मीटर) क्षेत्रावर सलग लागवड केलेली असावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी सामान्य गटासाठी ₹३०० आणि अनुसूचित जमातीसाठी ₹१५० आहे.
🌱 कोणती पिकं पात्र आहेत?
या स्पर्धेत खरीप हंगामातील एकूण ११ पिकांचा समावेश आहे:
- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर
- मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल
त्यापैकी मूग आणि उडीदसाठी अर्ज ३१ जुलै २०२५ पर्यंत स्वीकारले जातील, तर उर्वरित पिकांसाठी अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ आहे.
🏆 बक्षिसांचे तपशील
शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य तो गौरव मिळावा, यासाठी ही स्पर्धा तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर घेतली जाणार आहे. खाली बक्षिसांची रचना दिली आहे:
तालुकास्तर:
- प्रथम – ₹५,०००
- द्वितीय – ₹३,०००
- तृतीय – ₹२,०००
जिल्हास्तर:
- प्रथम – ₹१०,०००
- द्वितीय – ₹७,०००
- तृतीय – ₹५,०००
राज्यस्तर:
- प्रथम – ₹५०,०००
- द्वितीय – ₹४०,०००
- तृतीय – ₹३०,०००
📑 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- प्रवेशशुल्क भरल्याचे चलन
- ७/१२ व ८-अ उतारे
- जात प्रमाणपत्र (फक्त अनुसूचित जमातीसाठी)
- चिन्हांकित नकाशा
- बँक खात्याचे पासबुक / चेक प्रत
📞 अर्ज कोठे करावा?
इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज भरताना सर्व कागदपत्रे आणि फी यासह सादर करणे अनिवार्य आहे.