अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
बंगळुरु | तंत्रज्ञानाच्या दुनियेत मोठ्या पदांसाठी पदवी आणि भक्कम रिज्युमे आवश्यक मानले जातात. मात्र बंगळुरुस्थित एका स्टार्टअपने या पारंपरिक धारणेला आव्हान देत थेट 1 कोटी रुपयांची नोकरी फक्त कौशल्याच्या आधारावर देण्याची घोषणा केली आहे.
‘स्मॉलेस्ट एआय (Smallest AI)’ या स्टार्टअपने फुल-स्टॅक टेक लीड पदासाठी ही भरती काढली असून, 60 लाख रुपयांचा निश्चित पगार आणि 40 लाख रुपयांचे इक्विटी शेअर्स देण्याचं आश्वासन दिलं आहे.
📌 ना CV ना डिग्री – फक्त ‘हे’ दोन पुरावे पुरेसे!
कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामत यांनी ट्विटर/X वर या नोकरीसंदर्भात पोस्ट शेअर करत भरती प्रक्रिया स्पष्ट केली आहे. इच्छुक उमेदवारांनी फक्त हे दोन टप्पे पूर्ण करायचे आहेत:
- 100 शब्दांत स्वतःचा परिचय
- आपल्या सर्वोत्तम कामाची लिंक (GitHub, ब्लॉग, अॅप, प्रोजेक्ट्स इ.)
👨💻 कोणते कौशल्य आवश्यक?
या भरतीसाठी सुदर्शन यांनी काही महत्त्वाच्या तांत्रिक कौशल्यांचा उल्लेख केला आहे:
- Next.js चं सखोल ज्ञान
- React.js आणि Python चा मजबूत अनुभव
- स्वतःचा उपक्रम सुरू करण्याचा अनुभव (entrepreneurial mindset)
- समस्या सोडवण्याची क्षमता आणि कोडिंगमधील स्पष्टता
🌐 सोशल मीडियावर व्हायरल
ही पोस्ट आत्तापर्यंत 60,000 पेक्षा अधिक जणांनी पाहिली आहे. अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या असून काहींनी ही भरती प्रक्रिया पारदर्शक व योग्य असल्याचं म्हटलं आहे. काहींनी मात्र ‘अनुभव मागण्याने खरं टॅलेंट गमावलं जाईल’ अशी टीकाही केली. त्यावर सुदर्शन यांनी उत्तर दिलं की, “हा एक साधारण निकष आहे, खरी प्रतिभा अनुभवाच्या पलीकडे असते.”
🏆 संधी केवळ पात्र उमेदवारांसाठी
ज्या उमेदवारांकडे वरील कौशल्यं आणि अनुभव आहे, त्यांच्यासाठी ही एक सोनेरी संधी आहे. विशेष म्हणजे, या भरती प्रक्रियेत कोणताही पारंपरिक अडथळा नाही – ना डिग्री मागितली जाते, ना सीव्ही, ना कोणतीही परीक्षा. फक्त कौशल्य आणि आत्मविश्वास पुरेसा आहे.