अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली | UPI वापरणाऱ्यांसाठी 1 ऑगस्ट 2025 पासून महत्त्वाचे बदल होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) नवे API नियम जाहीर केले असून, हे बदल बँका आणि पेमेंट सेवा पुरवठादारांसाठी अनिवार्य असतील. यूपीआय प्रणाली अधिक जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्याचा यामागे उद्देश आहे.
दिवसाला फक्त ५० वेळाच बॅलन्स तपासता येणार!
UPI वापरकर्ते आपल्या अॅपवरून फक्त ५० वेळाच बॅलन्स तपासू शकतील. वारंवार केले जाणारे API कॉल्स यामुळं कमी होतील आणि यूपीआय यंत्रणेवर येणारा ताणही कमी होईल. अनेक वापरकर्ते व्यवहार करताना बारकाईने बॅलन्स तपासत असल्याने यावर मर्यादा आली आहे.
📞 मोबाईल नंबर लिंक स्टेटस – फक्त २५ वेळा
एखादा मोबाईल नंबर किती बँक खात्यांशी लिंक आहे, ही माहिती रोज फक्त २५ वेळाच तपासता येईल. हे देखील API कॉल्स कमी करण्याचा भाग आहे.
💸 ऑटो पेमेंट्ससाठी ठराविक वेळ
नेटफ्लिक्स, SIP, बीमा हप्ते यांसारख्या ऑटो डेबिट व्यवहार आता नॉन-पिक अवर्समध्ये होतील. म्हणजेच सकाळी १० वाजता, दुपारी १ ते ५ आणि रात्री ९.३० नंतर हे व्यवहार प्रक्रिया होतील. यामुळं मुख्य वेळेत सर्व्हर लोड टाळण्याचा उद्देश आहे.
पेमेंट स्थिती तपासण्याचेही नियम
जर एखादं UPI पेमेंट अडकले असेल, तर त्याची स्थिती फक्त ३ वेळा तपासता येणार आहे. त्यातही प्रत्येक वेळेस किमान ९० सेकंदांचं अंतर असणं अनिवार्य आहे. सतत स्टेटस चेक केल्यामुळे प्रणालीवर येणारा भार कमी करण्यासाठी ही तरतूद आहे.
🔒 NPCI ची सुरक्षा सूचना – ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
NPCI ने डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना काही खास सूचना दिल्या आहेत:
- केवळ अधिकृत अॅप्सचाच वापर करा
- कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
- APK फाइल्स, एसएमएस वा सोशल मीडियावरून आलेले अॅप्स डाऊनलोड करू नका
- पेमेंट करताना रिसीव्हरचे नाव नीट तपासा
- UPI PIN, OTP किंवा बँक डिटेल्स कुणासोबतही शेअर करू नका
- प्रत्येक व्यवहाराची सूचना मिळण्यासाठी अॅप नोटिफिकेशन आणि एसएमएस अलर्ट चालू ठेवा
📲 बदलांमुळे काय होणार?
या नव्या नियमांमुळे UPI यंत्रणेचा वापर अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होणार आहे. मात्र, सामान्य वापरकर्त्याला या मर्यादा थोड्याशा अडचणीच्या वाटू शकतात. NPCI चा भर सध्या फ्रॉड रोखण्यावर आणि ट्रान्झॅक्शन वेळ सुधारण्यावर आहे.