अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली – भारतीय लष्कराची ताकद वाढवण्यासाठी भारताने आणखी एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित Advanced Towed Artillery Gun System (ATAGS) ही तोफ आता अधिकृतपणे भारतीय सैन्यात दाखल होणार आहे. ही तोफ पुण्यातील DRDOच्या ARDE प्रयोगशाळेत विकसित करण्यात आली आहे. हे भारतासाठी केवळ तांत्रिक यश नसून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे.
🎯 48 किमी माऱ्याची क्षमता – जुन्या तोफा होणार बाद
ATAGS ही पारंपरिक तोफांपेक्षा जास्त शक्तिशाली, अचूक आणि टिकाऊ आहे. तिची मारा करण्याची क्षमता ४८ किलोमीटर आहे, जी आधीच्या तोफांपेक्षा सुमारे 25 टक्क्यांनी अधिक आहे. आता लष्करातल्या जुन्या आणि क्षमतेने मर्यादित असलेल्या तोफांची जागा ही स्वदेशी विकसित केलेली ATAGS घेणार आहे.
🛠️ पूर्णपणे इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टम — उंच डोंगर, रखरखत वाळवंट काहीच अडथळा नाही
ATAGS चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टिम. त्यामुळे हे शस्त्र वापरणे आणि त्यातून गोळीबार करणे अधिक सुलभ झाले आहे. डोंगराळ भाग, दगडधोंडे, वाळवंट — कुठेही ही तोफ अचूकतेने काम करू शकते. यामध्ये दारूगोळा लोड करणे, लक्ष्य साधणे आणि गोळीबार यासाठी डिजिटल इंटरफेसचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे मानवी त्रुटींची शक्यता कमी होते आणि कार्यक्षमता वाढते.
🧪 2012 मध्ये सुरू झालेला प्रकल्प, 2024 मध्ये दाखल!
ARDEचे संचालक ए. राजू यांनी सांगितले की, “डिझाइनपासून प्रेरणापर्यंतचा प्रवास आम्ही अवघ्या १२ वर्षांत पूर्ण केला आहे.” संरक्षण मंत्रालयाने ATAGS प्रकल्पाचे वर्णन ‘Mission Mode Success’ असे करत त्याचे विशेष कौतुक केले आहे. या यशामुळे भारत फक्त आयुधांमध्ये आत्मनिर्भर होत नाही, तर जगभरातील संरक्षण उत्पादनातही एक महत्त्वाचा स्पर्धक ठरतो आहे.
🔍 सहज देखभाल, लष्करासाठी दिलासादायक
ATAGS ही तोफ फक्त घातकच नाही, तर देखभाल करण्यास सुद्धा अतिशय सुलभ आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाच्या किंवा सीमांवरील ऑपरेशन्सदरम्यान मशिनरी बिघडण्याची भीती कमी होते. त्यामुळे लष्कर अधिक आत्मविश्वासाने काम करू शकणार आहे.
💡 आत्मनिर्भर भारतात ‘ATAGS’ चे योगदान
ATAGS ही तोफ 100 टक्के भारतीय संशोधन, डिझाइन आणि उत्पादनावर आधारित आहे. त्यामुळे या यशात ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे महत्त्वाचे योगदान आहे. राजू यांनी सांगितले की, “ARDE ही केवळ संशोधन संस्था नाही, ती भारताच्या संरक्षण भविष्यासाठी काम करणारी ताकद आहे.” भारतीय लष्कराला अधिक सक्षम बनवण्याच्या दिशेने ATAGS ही एक ऐतिहासिक पायरी आहे. ही तोफ केवळ तांत्रिक दृष्ट्या उत्कृष्ट नाही, तर ती राष्ट्राच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. पुण्याच्या भूमीत घडवलेली ही ताकद आता सीमेवर भारतीय वीर सैनिकांच्या हातात सुरक्षिततेचा एक नवा शस्त्रभांडार ठरणार आहे.