WhatsApp

“शाळेतच मुलींवर अत्याचार? सव्वाशे विद्यार्थिनींची गणवेश उतरवून तपासणी!”

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
ठाणे | ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक धक्कादायक आणि लज्जास्पद घटना घडली आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर सुमारे सव्वाशे विद्यार्थिनींचे गणवेश उतरवून त्यांची तपासणी करण्यात आली. या अमानुष कृत्याने विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक प्रचंड घाबरले असून, संतप्त पालकांनी शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाईची मागणी करत आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.



या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्याध्यापिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहापूर परिसरात खळबळ माजली आहे. शाळा सध्या बंद असून, प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. या प्रकरणाने मुलींच्या सुरक्षिततेचा आणि शाळेतील नैतिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या मुख्याध्यापिकेने पाचवी ते दहावीच्या सव्वाशे विद्यार्थिनींना शाळेच्या हॉलमध्ये बोलावलं. यावेळी स्वच्छतागृहात आढळलेले रक्ताचे डाग प्रोजेक्टरवर दाखवून मुलींना मासिक पाळीची विचारणा करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ८ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान सव्वाशे विद्यार्थिनींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्र बोलावून त्यांचे गणवेश काढून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणात मुख्याध्यापिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहापूर परिसर हादरला आहे. शाळा सध्या बंद आहे आणि प्रशासनाशी संपर्क साधता येत नसल्याने त्यांची अधिकृत भूमिका जाणून घेता आली नाही.

घटना कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर मुख्याध्यापिकेने सव्वाशे मुलींना हॉलमध्ये एकत्र बोलावलं. यावेळी प्रोजेक्टरवर रक्ताचे डाग दाखवून मासिक पाळी आली आहे का, याची विचारणा करण्यात आली. त्यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे, त्यांचे हाताचे ठसे घेण्यास सांगितलं आणि ज्या मुलींना मासिक पाळी आली नाही, त्यांना स्वच्छतागृहात नेऊन त्यांचे कपडे उतरवून तपासणी करण्याचे आदेश दिले. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरल्या आणि त्यांनी घरी येऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. काही मुलींनी दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास नकार दिला. पालकांचा संताप आणि कारवाईविद्यार्थिनींनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी शाळेत आणि पोलीस ठाण्यात धाव घेतली. ३० ते ४० पालकांनी शाळेत ठिय्या आंदोलन केलं आणि मुख्याध्यापकांना जाब विचारला.

या घटनेनंतर गटशिक्षण अधिकारी रामचंद्र विशे यांनी शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. शाळा सध्या बंद आहे. विद्यार्थिनींची मानसिकता आणि पालकांचा आक्रोशया प्रकारामुळे विद्यार्थिनींवर गंभीर मानसिक परिणाम झाला आहे. काही मुली बोलण्याच्या मन:स्थितीतही नव्हत्या, तर काहींनी शाळेत जाण्यास नकार दिला. पालकांनी सांगितलं की, मुली खूप घाबरलेल्या आहेत आणि त्यांना शाळेत असुरक्षित वाटत आहे. शाळा प्रशासनाची भूमिकाशाळा प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. बीबीसी मराठीने शाळेच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता, मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याचं सांगण्यात आलं, मात्र अधिक माहिती देण्यात आली नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!