WhatsApp

व्हिडिओ | “एक साप, एक अधिकाऱ्याचं धाडस, पाहा एक थरारक क्षण!”

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
तिरुअनंतपुरम :
“सर्पराज” किंग कोब्रा समोर उभी ठाकलेली एक महिला अधिकाऱ्याची धाडसगाथा सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. केरळ वन विभागातील अधिकारी जीएस रोशनी यांनी १६ फूट लांबीचा किंग कोब्रा काही मिनिटांत पकडत पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडून देत आपल्या कार्यकुशलतेची आणि निर्भयतेची ठसा उमठवला आहे. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून देशभरातून या महिलेचे कौतुक होत आहे.



🐍 १६ फूटाचा साप आणि एका महिलेचा निर्धार

घटना आहे केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पेप्पारा जंगलाजवळील पारुथीपल्ली रेंजची. स्थानिक नागरिक जिथे नियमितपणे नदीत आंघोळ करतात, तिथेच अचानक एक किंग कोब्रा आढळून आला. हा साप इतका महाकाय आणि धोकादायक होता की स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तात्काळ पाचारण झालं रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या जीएस रोशनी यांना.

साधारणपणे अशा मिशनसाठी अनुभवी व वरिष्ठ अधिकारी पाठवले जातात. मात्र यावेळी अवघ्या काही मिनिटांतच रोशनी यांनी सापाला आपल्या कौशल्याने नियंत्रित करत सुरक्षितपणे पकडलं आणि जंगलात जाऊन नैसर्गिक ठिकाणी सोडलं.


🌿 रोशनीचा ८ वर्षांचा अनुभव आणि ८०० सर्पबचाव

जीएस रोशनी या गेल्या ८ वर्षांपासून वन विभागात कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त साप पकडले आहेत. मात्र किंग कोब्रा हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि धोकादायक सर्प होता. त्या प्रथमच अशा सर्पाच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्या होत्या.



Watch Ad

या कामगिरीचं विडिओ फुटेज निवृत्त आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर करत लिहिलं — “ग्रीन क्वीन्स आणि त्यांच्या शौर्याला सलाम!” त्यांनी ही घटनाही शेअर केली की रोशनी केवळ एक अधिकारी नाही, तर एक प्रशिक्षित सर्परक्षक असून केरळच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमचा भाग आहेत.

Leave a Comment