WhatsApp

अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता एका अल्पवयीन मुलीचा धावत्या रिक्षात विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अकोला येथील आहे.



अकोल्यात एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका ऑटोचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीसोबत नराधम ऑटो चालकाने लगट करण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना ऑटोचालकाने तिच्या हाताला आणि दंडाला चावा देखील घेतला. कशीबशी या मुलीने ऑटो चालकाच्या तावडीतून आपली सुटका केली.

अकोल्यातील या प्रकारामुळे पालकांममध्ये धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान ऑटो चालकाच्या विरोधात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाफर खान सुभेदार खान असं आरोपी ऑटो चालकाचे नाव आहे.

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा विनयभंग

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक १६ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी अकोल्यात आली होती. अकोला येथे ती भाड्याने घेऊन राहत होती. गेल्या दोन दिवसांपासून ती आजारी होती. आजारी असल्याने ती आपल्या गावी गेली होती. तेथून ती बसने अकोल्यात पुन्हा आली. बस स्थानकातून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जाण्यासाठी तिने रिक्षा पकडली.

बस स्थानकावरुन निघालेली रिक्षा तिच्या रूमकडे जाण्यासाठी निघाली मात्र, वाटेतच रिक्षा चालकाने रिक्षा भलत्याच मार्गाने वळवली. यामुळे मुलीला संशय आला आणि तिने लगेचच आपल्या मित्राला फोनवरुन संपर्क केला. तितक्यात रिक्षा चालकाने या मुलीचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि विनयभंग केला.

या ऑटो चालकाने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला, मात्र या दरम्यान तिने कशी बशी सुटका करीत पळ काढला. या संपूर्ण प्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी ऑटो चालकाला अटक करून त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले.

रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी

जाफर खान सुभेदार खान असं अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे. याबाबत अधिक तपास सिव्हिल लाईन ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहे.दरम्यान या घटनेनंतर पोलीस ठाण्यात प्रहार आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते दाखल झाले होते. विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी या दरम्यान करण्यात आली.

Leave a Comment

error: Content is protected !!