WhatsApp

📚 ‘तुझं कुठे लफडं आहे का?’ — वर्गातच विद्यार्थिनीला शिक्षकाचा विकृत सवाल, पुण्यात शिक्षणाचा तमाशा उघड

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
पुणे |
शिक्षणाची राजधानी मानल्या जाणाऱ्या पुण्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर येथील एका शाळेत ‘मंगेश भाऊ’ नावाच्या शिक्षकाने आठवीतील विद्यार्थ्यांना प्रेमसंबंध आणि विकृत संवाद देत विद्यार्थिनीला ‘तुझं कुठे लफडं आहे का?’ असा सवाल विचारला. या प्रकारामुळे मुलीच्या मनावर मोठा मानसिक आघात झाला असून, तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.



ही घटना चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शाळेत घडली असून, संबंधित शिक्षकावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस तपासही सुरू आहे.


📌 काय घडलं नेमकं?

पीडित मुलगी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. पीटीचा तास सुरू असताना शिक्षकाने विद्यार्थ्यांशी ‘प्रेमसंबंध’ कसे ठेवावेत, मुलींना कसं पटवावं अशा गोष्टी शिकवायला सुरुवात केली. त्यात तो म्हणाला, “मुलींना पाहिल्यावर हृदयाचे ठोके कसे वाढतात, त्यांच्यावर प्रेम कसं करायचं” अशा आक्षेपार्ह संवादांनी संपूर्ण वर्गात वातावरण दूषित केलं.

या थरारानंतर शिक्षकाने एका विद्यार्थिनीला वर्गात उभं करून दोन बोटं जोडत विचारलं – ‘तुझं कुठे लफडं आहे का?’ यामुळे मुलगी अत्यंत घाबरली व घरी जाऊन घडलेली घटना पालकांना सांगितली. पालकांनी तात्काळ चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


👮 पोलीस तपास सुरू, शिक्षकावर गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षकांच्या माहितीनुसार, संबंधित ‘मंगेश भाऊ’ नावाच्या शिक्षकावर लैंगिक छळ व बालसंगोपन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही यासंदर्भात विचारणा केली जात आहे.


😡 शिक्षण व्यवस्था का गप्प?

या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ‘विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी अश्लीलतेचं धडे देणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी सोशल मीडियावरून होत आहे.


🧾 दुसरी धक्कादायक घटना — डिलिव्हरी बॉयचा लैंगिक छळ

दरम्यान, पुण्यातील कोंढवा परिसरात आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. एका डिलिव्हरी बॉयने एका तरुणीच्या घरी घुसून तिच्यावर पेपर स्प्रे फेकला, अश्लील कृत्य केलं आणि तिच्या पाठीवर झोपून सेल्फी काढला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तो अद्याप फरार आहे.


📢 पोलिसांचं आवाहन

पोलीस नागरिकांना सांगत आहेत की, विद्यार्थ्यांवरील अशा प्रकारच्या छळाच्या घटनांची गंभीर दखल घ्यावी आणि कोणत्याही संशयास्पद कृत्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये द्यावी.

Leave a Comment

error: Content is protected !!