WhatsApp

गे-डेटिंग’ अँप’द्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..’गे-डेटिंग’ अप्स समलिंगी पुरुषांसाठी ठरतो फसवणुकीचा मोठा अड्डा..

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २९ जून २०२५ अकोला जिल्हा रिपोर्टर अनुराग अभंग:- जग जितके जास्त डिजिटल जगाकडे वळले आहे तितकेच ते धोकादायक देखील असल्याचे आपण सर्वत्र पाहत आहोतच क्षणभंगुर सुखासाठी आपण या इंटरनेट च्या नेट मध्ये आपण अडकतो अशीच विचित्र घटना अकोला शहरात घडली आणि पोलिस प्रशासन कामाला लागून त्वरीत त्यांना आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सध्याचे जग हे मोबाईलचे जग असून संपूर्ण ब्रह्मांड आपल्या हातात आल्याचे याचा काही जण फायदा घेतात तर काही जण त्याचा दुरुपयोग करतात अशीच एका बॅक अधिकाऱ्यांसोबत धक्कादायक घटना घडली आणि अघटीत घडले.



अकोला न्यूज नेटवर्कला मिळालेल्या माहिती नुसार शहरातील अकोल्यात ‘गे-डेटिंग’ अँप’द्वारे पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय.. आजकाल ‘गे-डेटिंग’ अप्स समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलाय… या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहेये.. अकोल्यात देखील ‘गे-डेटिंग’ ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली..

या appवर ओळख करीत, त्यानंतर या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञात स्थळी बोलवण्यत आलं, अन तिथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केलाय.. इतकंच नव्हे तर या संपूर्ण घटनेचं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले. पुढं बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करीत तब्बल 80 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केलीय. चौघांपैकी दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आले.. मनीष नाईक राहणार मलकापूर आणि मयूर बागडे राहणार सरकारी गोडाऊन खदान असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

नेमकं काय घडलं होतय…

अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत एका पीडित बँकेच्या अधिकाऱ्याने समलिंगी अर्थातच ‘गे-डेटिंग’ अ‍ॅपवरुन फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलये.. बँकेच्या अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटलं आहे की समलिंगी डेटिंग अ‍ॅपवरुन एका व्यक्तीने संपर्क साधला. पुढं दोघांत चांगली मैत्री झाली अन बोलणं सुरु झालं.. 14 जून रोजी भेटायचं ठरलं.. त्यानंतर अकोल्यातीलच हिंगणा फाट्याजवळ बँकेचा अधिकारी त्या व्यक्तीला भेटायला गेला.. तिथे मनीष नाईक हा भेटायला पोचला, अन तिथून दोघेजण कारने शहरातल्या नदीच्या काठी गेले.

या ठिकाणी त्याने बँकेच्या अधिकाऱ्यासोबत समलिंगी संबंध प्रस्थापित केलेत. त्यानंतर त्याने त्याचे 3 साथीदाराना देखील बोलावून घेतलं.. त्यांनी देखील या अधिकाऱ्यावर अत्याचार केलाय.. या दरम्यान, पीडिताचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि त्यावरुन ब्लॅकमेल करत माझ्याकडून पहिल्या टप्प्यात 30 हजार रुपयांपेक्षा अधिक रुपये उकळले’, त्यानंतर काही दिवसातच पुन्हा पैसे घेतले.. असे एकत्रित आतापर्यंत 79 हजार 300 रुपये उकळले आहे.. अशी माहिती पीडित व्यक्तीने पोलिसांना दिली.

खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदार यांनी दिलेल्या माहितनुसार, या टोळीला पकडण्यासाठी विशेष सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांकडं केवळ आरोपीचा मोबाईल क्रमांक होता. मात्र ठोस पुरावे हाती नव्हते. म्हणून पीडित आरोपीच्या शोधांसाठी पीडित व्यक्ती पुन्हा तरुणांसोबत भेटण्यासाठी गेला. त्यावेळी मनीष नाईक हा तिथे आला. लागलीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अशा प्रकारे संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेत दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

आरोपी पीडितांना इंजेक्शन द्यायचे, अन…

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष नाईक याच्याकडे इंजेक्शन होते. हा भेटण्यासाठी आलेल्या पिडीतांना अर्थातच गे-पुरुषांना इंजेक्शन द्यायचा, जेणेकरून त्यांच्यामध्ये उत्तेजना निर्माण व्हायची. त्यानंतर हे पीडितांवर अत्याचार करायचे. दरम्यान आतापर्यंत या चौघांनी गे-डेटिंग ॲपच्या माध्यमातून कित्येकांची फसवणूक केली, याचा तपास देखील पोलीस करणार आहेत. दरम्यान, संपूर्ण घटनेनंतर फसवणूक झालेल्या पिडीतांना समोर येण्याच आवाहन पोलिसांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!