Horoscope Today | दैनिक राशिफल ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह कॅलेंडरच्या हिशोबाचे विश्लेषण केले जाते.
● मेष
आज नवे संकल्प सिद्ध करण्यासाठी योग्य दिवस आहे. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, पण संयमाने मार्ग निघेल. आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल. कौटुंबिक विषयात निर्णय घेताना थोडं थांबावं.
शुभ अंक : ९
शुभ रंग : लाल
● वृषभ
आज तुमचं आत्मभान जागृत राहील. व्यवसायात काही नवीन संधी मिळू शकतात. जुने मित्र अचानक भेटतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. शांत राहा, लाभ तुमचाच होईल.
शुभ अंक : ६
शुभ रंग : पांढरा
● मिथुन
आजचा दिवस भागदौडीत जाईल. कामावर लक्ष केंद्रित करा. घरच्यांसोबत थोडा वेळ घालवा. जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना दक्ष राहा.
शुभ अंक : ५
शुभ रंग : हिरवा

● कर्क
मनातील अस्वस्थतेमुळे निर्णय चुकू शकतो. तरीही आर्थिक बाजू मजबूत राहील. घरात एखादी आनंददायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस लाभदायक. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील.
शुभ अंक : २
शुभ रंग : चंदेरी
● सिंह
नवीन संधी तुमच्या दाराशी येतील. मनात उधाण आलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा दिवस. वरिष्ठांची साथ मिळेल. जुनी गुंतवणूक फायदा देईल. पण अहंकार टाळा.
शुभ अंक : १
शुभ रंग : सोनेरी
● कन्या
दैनंदिन जीवनात बदल अपेक्षित आहे. नवा करार फायदेशीर ठरेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी. दिवस सकारात्मक ऊर्जा देणारा.
शुभ अंक : ४
शुभ रंग : निळा
● तूळ
कौटुंबिक वाद मिटवण्यास आजचा दिवस उत्तम. सामाजिक सन्मानात वाढ होईल. प्रेमसंबंध मजबूत होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रांशी संवाद साधताना स्पष्टतेने बोला.
शुभ अंक : ७
शुभ रंग : गुलाबी
● वृश्चिक
कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. मानसिकदृष्ट्या समाधान वाटेल. गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्ला घ्या. आरोग्यावर विशेष लक्ष द्या, विशेषतः पचनसंस्थेवर.
शुभ अंक : ८
शुभ रंग : जांभळा
● धनु
मनात नवे विचार उमटतील. कामात उत्साह वाढेल. नवा प्रकल्प सुरू करण्यास उत्तम दिवस. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. छोट्या प्रवासाचा योग संभवतो.
शुभ अंक : ३
शुभ रंग : केशरी
● मकर
कार्यक्षेत्रात नावीन्य येईल. दिवसाचे नियोजन नीट ठेवा. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक पावले उचला. कौटुंबिक सुख वाढेल. मन प्रसन्न राहील.
शुभ अंक : ५
शुभ रंग : राखाडी
● कुंभ
चुकीच्या गोष्टींना दूर सारून योग्य मार्ग निवडा. व्यवसायात लाभाचे संकेत. प्रेमसंबंधात संवाद आवश्यक. शेजाऱ्यांशी मतभेद टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा, विजय तुमचाच.
शुभ अंक : ६
शुभ रंग : मोरपंखी
● मीन
कलेच्या क्षेत्रात असाल तर आज नाव मिळण्याची शक्यता. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. जोडीदाराकडून आश्चर्य वाटेल. आत्मविश्वासात वाढ होईल. थोडा वेळ ध्यान साधनेत घालवा.
शुभ अंक : ९
शुभ रंग : हलका पिवळा