WhatsApp


Liquor Shop तळीरामांसाठी झिंगाट निर्णय, रातभर बसा अन् सकाळी., दारुची दुकानं आणि बार इतक्या वाजेपर्यंत सुरु राहणार

Share

Liquor Shop ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या निमित्ताने मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे… या बातमीने तुम्ही ठरवलेल्या पार्टीचा उत्साह वाढणार आहे ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट देण्यात आली दिनांक २४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या १ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

अकोला, दि. २२ : नाताळ सण व नववर्ष स्वागत उत्सवानिमित्त मद्य विक्रीची दुकाने दि. २४, २५ व ३१ डिसेंबर रोजी अधिक काळ सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला. आदेशानुसार, विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान (एफएल-२) व बंद बाटलीतून बिअर विक्री (एफएल बीआर-२) या तिन्ही दिवशी रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत करण्यास परवानगी आहे.

परवाना कक्ष (एफएल-३) व क्लब (एफएल-४) या तिन्ही दिवशी पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री ११:३० ते पहाटे पाच वाजेपर्यंत व पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रासाठी रात्री दीड ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहू शकतील.

देशी दारू किरकोळ मद्यविक्री (सीएल-३) महापालिका तसेच अ आणि ब वर्ग नगरपालिका क्षेत्रातील दुकानांसाठी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. सवलत दिलेल्या वेळेव्यतिरिक्त अधिक काळ मद्यविक्री सुरू ठेवल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा आदेशात देण्यात आला आहे.


‘या’ दुकानांना असेल परवानगी

महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम १३९ (१) (सी) आणि कलम १४३) (२) (एच) (४) अन्वये नाताळ आणि नववर्षानिमित्त २४, २५ आणि ३१ डिसेंबरला राज्यातील विविध मद्य दुकानं निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघडे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या आदेशानुसार, विदेशी मद्य विकणारं किरकोळ विक्रीचं दुकान, उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल -2 अनुज्ञप्ती, तसेच एफएळडब्ल्यू-2 प्रकारच्या दारुच्या विक्रेत्यांना रात्री उशिरापर्यंत दारु विक्रीस मान्यता दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!