45 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

अकोला न्यूज नेटवर्क ब्यूरो गणेश बुटे प्रतिनिधी चोहत्त चोहोट्ट बाजार :– परिसरातील मुख्य महामार्गावरील टाकळी बु रस्त्याच्या बाजूला गुरुवारी संध्याकाळी एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय विठ्ठल सनगाळे (वय अंदाजे 45) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

हा प्रकार संध्याकाळी साधारण 9 वाजण्याच्या सुमारास घडला असून सनगाळे याने मुख्य रस्त्याजवळच्या झाडाला गळफास लावला होता. काही नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चोहोट्टा बाजार पोलीस चौकीला कळविले.

यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह झाडावरून काढून शवविच्छेदनासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सनगाळे याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिस आणखी तपास करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!