अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
अकोला : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथ. मराठी शाळा क्रमांक २ बोरगांव मंजु येथे प्रथम फाउंडेशन महाराष्ट्र, शिक्षण विभाग प स अकोला व जि प प्राथ मराठी केंदशाळा बोरगाव मंजु क्र. २ चे वतीने आयोजित १मे ते १५ जून पर्यंत चे दिड महिन्याचे मोफत उन्हाळी बालसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्री श्याम राऊत साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अकोला यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय श्री गोपाल सुरे सर् , (केंदप्रमुख अकोला शहर) आदरणीय सौ. सुनिता कोथळकर मॅडम, (केंद्रप्रमुख बोरगाव मंजु) आदरणीय श्री. रजनीश ठाकरे सर, माननीय अमर कांबळे सर (प्रथम संस्था) मा श्रीकृष्ण गावंडे सर केंद्रप्रमुख दापुरा/अकोला शहर हे लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना ने झाली. यानंतर शिबिरातील विद्यार्थ्यांनी आनंददायी शिक्षणाच्या कृतींची प्रात्यक्षिके सादर केली. सुंदर नृत्य आणि उद्बोधन पर नाटिका शिबिरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केली. उन्हाळी शिबिरामध्ये मुलांच्या शारीरिक व मानसिक गुणांबरोबरच बौद्धिक गुण विकसित करणारे उपक्रम राबविण्यात आले. त्यातूनच मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मुलांनी आपली कला, नृत्य, नाटीका या माध्यमातून सादर केली.शिबिरात विद्यार्थांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पालकवर्गाची उपस्थिती शेवटच्या कार्यक्रमा पर्यंत होती.सदर झालेले सर्व कार्यक्रम अत्यंत दर्जेदार व प्रबोधन करणारे होते. मुलांचा अभिनय, प्रात्यक्षिक, व नृत्य यात अत्यंत उस्फुर्त सहभाग होता.

इंटरनॅशनल school ही नाटिका, तसेच देशभक्तीपर नृत्य व नाटक खूप प्रभावी झाले. कार्यक्रमाचा दर्जा अत्यंत उच्च होता. गावातील इतर शाळेचे विद्यार्थी सुद्धा शिबिरात सहभागी झाले होते सर्व पालक, अधिकारी वर्ग कार्यक्रमाने भारावून गेले. या कार्यक्रमासाठी अत्यंत कष्ट घेणाऱ्या आमच्या शिबीर स्वयंसेविका व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सौ. वर्षा गिऱ्हे व शिक्षणप्रेमी कुमारी प्रगती तायडे यांना आदरणीय राऊत साहेब यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. आदरणीय राऊत साहेब यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व स्वयंसेवकांचे कौतुक केले व पालकांचे उद्बोधन केले. जि प केंद्रशाळा बोरगाव च्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व भारत टॅलेंट सर्च परीक्षा मधे घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तथा शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच आदरणीय श्री गोपाल सुरे सर यांनी सुद्धा शाळेविषयी गौरवोद्गार काढून पालकांचे प्रबोधन केले.आदरणीय सौ. सुनीता कोथळकर मॅडम यांनी आपल्या उदबोधनांमध्ये उन्हाळी शिबिराचा समारोपाचा कार्यक्रम हा येथे जसा संपन्न झाला तसा पूर्ण जिल्ह्यातच काय पण राज्यात सुद्धा झाला नसेल असे गौरवोद्गार काढून शाळेचे व स्वयंसेवकाचे कौतुक केले. श्याम राऊत साहेब यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. अशाप्रकारे अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम उन्हाळी शिबिर समारोपाच्या निमित्ताने शाळेत संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, आदरणीय श्री. श्रीकृष्ण गावंडे सर, सर्व शिक्षक वृंद व स्वयंसेविका सौ वर्षा गिऱ्हे व प्रगती तायडे यांनी अतिशय मेहनत घेतली. शिबिराची फलश्रुती म्हणजे जवळजवळ 17 ऍडमिशन गावातील कॉन्व्हेंट व इतर शाळांमधून जि प शाळेला मिळाल्या. याप्रसंगी कु आर्या पांडे या विद्यार्थिनीची पालक तिची आई सौ,रजनी अमित पांडे ज्या डवले कॉलेज अकोला येथे प्राद्यापक आहेत व मुळच्या बोरगाव येथील रहिवाशी आहेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्वं शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अंगणवाडी सेविका शा पो आ कर्मचारी व पालक यांनी सहकार्य केले आदरणीय श्रीकृष्ण गावंडे सर मुख्याध्यापक यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.