WhatsApp

शाप दूर करण्याच्या बहाण्याने मंदिर व्यवस्थापकाचा महिलेवर बलात्कार; पुजारी फरार

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
बंगळुरू: आध्यात्मिक समाधानासाठी केरळमधील पेरिंगोट्टुकारा मंदिरात गेलेल्या ३८ वर्षीय महिलेवर मंदिर व्यवस्थापकाने शाप दूर करण्याच्या नावाखाली वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी अरुण टीए (४०) याला अटक केली, तर सहआरोपी पुजारी उन्नी दामोदरन फरार आहे. पीडितेने बंगळुरूच्या बेलंदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



मार्च महिन्यात मंदिराच्या ऑनलाइन माहितीवर विश्वास ठेवून पीडितेने तीन मित्रांसह मंदिराला भेट दिली होती. २०१६ मध्ये पतीच्या निधनानंतर ती दोन मुलांचे संगोपन एकटीच करत होती. वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींना तोंड देत असताना तिला मंदिरातून समस्यांवर मात करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, आरोपी अरुण आणि पुजाऱ्याने जादूटोणा झाल्याचे भासवून खास विधीच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केले.

सुरुवातीला पीडितेने विधीसाठी २४ हजार रुपये दिले. पुढील खर्च अरुणने स्वतः करत असल्याचे सांगितले, परंतु नंतर त्याने धमक्या देऊन तिच्यावर दबाव टाकला. अरुण तिला वारंवार फोन आणि व्हिडीओ कॉलद्वारे धमकावत असे. एकदा त्याने तिला विवस्त्र होण्यास सांगितले आणि नकार दिल्यावर तिचा खासगी व्हिडीओ असल्याची धमकी दिली. तसेच, तिच्या मुलांवर काळी जादू करून इजा पोहोचवण्याची धमकी दिली.

पोलिसांनी अरुणविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकीचे गुन्हे दाखल केले असून, फरार पुजाऱ्याचा शोध सुरू आहे. हा प्रकार मंदिरांसारख्या पवित्र स्थळांचा गैरवापर आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित करतो.

Watch Ad


१० मे रोजी पीडितेने मंदिराला भेट दिली. तेव्हा अरुणने तिला मंदिर परिसरातील एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यावेळी मंदिराचा पुजारी दामोदरन हा बाहेर पहारा देत होता. २१ मे रोजी पुन्हा एकदा अरुणने पीडितेला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडितेने नाईलाजाने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अरुणला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!