WhatsApp


विठू माऊलीचं दर्शन घ्यायचंय? घरबसल्या मिळवा टोकन! जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
अकोला:  यंदा भाविकांना विठुरायाच्या दर्शनसाठी तासन् तास रांगे उभे राहावे लागू नये यासाठी टोकण प्रणालीची सुविधा सुरु केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केली,”प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली चाचणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीला २६ जूनपर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. यामधील काही त्रुटी आणि बदल करून पुढे ही सुविधा सुरू करणार आहे. समितीच्या संकेतस्थळावरून ही सुविधा सुरू असून भाविकांसाठी ऑफलाइन म्हणजेच दर्शनरांगेच्या माध्यमातून देखील दर्शन घेता येणार आहे. रोज १ हजार २०० भाविकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत देवाची पुजा-आरती वगळून प्रत्येक तासाला २०० भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी टोकन दर्शन कसे बुक करावे?

स्टेप १ : बुकिंग करण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून भेट द्या.
स्टेप २: त्यानंतर Online Darshan Pass Booking या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला फॉर्म कसा भरावा याची माहिती थोडक्यात दिली आहे. त्यानंतर ‘लॉग ईन’ पर्यायावर क्लिक करा.
स्टेप ३ : लॉगिन पेजवर मोबाइल नंबर टाका.
स्टेप ४ : तुमच्या दिलेल्या नंबरवर पाठवला OTP जाईल, तो OTP टाका आणि ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करा
स्टेप ५ : OTP व्हेरिफिकेशननंतर पोर्टलमध्ये लॉगिन करा.
स्टेप ६ : तुम्हाला ज्या तारखेला भेट द्यायची आहे ती तारीख निवडा, किती वाजता दर्शन घ्यायचे आहे ती वेळ निवडा आणि आवश्यक माहिती भरा आणि त्याची प्रिंट काढून स्वत: जवळ ठेवा.
स्टेप ७: दर्शनाच्या दिवशी, मंदिराच्या शेजारील नामदेव पायरीजवळील श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथून या टोकनची पडताळणी करून घ्या.
स्टेप ८: त्यानंतर दर्शन हॉलमध्ये प्रवेश मिळेल आणि ठरलेल्या वेळेनुसार थेट दर्शन रांगेतून जाऊन विठ्ठू माऊलीचे दर्शन घेता येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!