WhatsApp

नागपूरला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी; राधे नगरात नगदी व चांदीच्या वस्तू लंपास

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अनुराग अभंग रिपोर्टर अकोला दिनांक ८ जून २०२५ :- अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राधे नगरात एका बंद घरात लाखोंची चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील रोख रक्कम व चांदीचे दागिने लंपास केले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



अकोला शहरातील राधे नगर परिसर पुन्हा एकदा चोरट्यांच्या रडारवर आला आहे. ममता अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये भरदिवसा लाखोंचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. संबंधित फ्लॅटमधील कुटुंब कामानिमित्त नागपूरला गेले असताना ही धाडसी चोरी झाली.

सकाळी नेहमीप्रमाणे पेपर टाकण्यासाठी आलेल्या पेपरवाल्याच्या नजरेत फ्लॅटचा तुटलेला कडीकोंडा भरला. त्याने तात्काळ बाजूच्या शेजाऱ्यांना ही माहिती दिली आणि त्यांनी नागपूरला गेलेल्या कुटुंबाशी संपर्क साधला. सायंकाळी घरी परतलेल्या कुटुंबाने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर सिटी कोतवालीचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत सापडले, तर रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असा एकूण लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठसे तज्ज्ञ आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या भागात सीसीटीव्ही नसल्याने तपासात मोठ्या अडचणी येत आहेत. अकोला पोलिसांकडून वारंवार नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले जात असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून, आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, नागरिकांनी आता तरी सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहावं, अशी मागणी होत आहे. पोलिसांकडून परिसरातील काही संशयितांवर लक्ष ठेवण्यात येत असून, तपास सुरू आहे.

तुमचं मत, तुमच्या अडचणी आता सर्वांपर्यंत पोहोचतील !

तुमच्या आसपासची कोणतीही घटना, समस्या, तक्रार, बातमी, अडचण, किंवा सामाजिक प्रश्न तुमच्याकडे असल्यास आम्हाला पूर्ण माहिती आणि फोटो/व्हिडीओसह
👉 https://tinyurl.com/3mb7zrjj 👈 या लिंक वर क्लिक करून पाठवा. आमचं न्यूज चॅनल तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवेल !

[कॉपीराईट © 2025 | ANN Akola News Network]

Leave a Comment

error: Content is protected !!