WhatsApp


इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट करून धर्माचा अपमान: अकोल्यामध्ये १९ वर्षाच्या तरुणाला अटक, थेट तुरुंगात रवानगी

Share

सोशल मीडियाचा गैरवापर करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या प्रकारांमध्ये सध्या वाढ होत असून, आज अकोला शहरातील अकोट फाईल पोलिसांनी एक धक्कादायक उदाहरण समोर आणले आहे. इंस्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून धार्मिक श्रद्धांचा अपमान करणाऱ्या १९ वर्षीय आरोपीला अकोट फाईल पोलिसांनी ताब्यात घेऊन अकोला सेंट्रल जेलमध्ये रवानगी केली आहे. ही घटना १६ मे २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ६.३० वाजता समोर आली.

घटना कशी उघडकीस आली? omrathod6539 या नावाने बनवलेल्या इंस्टाग्राम खात्यावरून आरोपीने एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून एका विशिष्ट धर्मावर आणि श्रद्धांवर अत्यंत अपमानास्पद आणि भडकावू मजकूर अपलोड केला गेला होता. यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता होती. सदर पोस्ट ही बुद्धिपुरस्सर व दृष्ट उद्देशाने टाकण्यात आली असल्याची पोलिसांची प्राथमिक चौकशीतून माहिती आहे.

तक्रार प्राप्त होताच अकोट फाईल पोलिसांनी त्वरीत कारवाई करत अप. क्र. 261/25 नुसार कलम 299 BNS सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(अ) व (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलीस पथकाने तपास सुरू केला आणि काही तासांतच आरोपीला ओळखून त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव :- दर्शन जितेंद्र यादव (वय १९), रा. सुकोडा फाटा, अकोट रोड, ता. व जि. अकोला असे असून या तत्पर कारवाईतून पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सतर्कता दिसून आली.

ह्या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली एएसआय अनिस पठाण, प्रशांत इंगळे, हर्षल श्रीवास, संतोष चिंचोळकर, योगेश काटकर, ईमरान शाह, गिरीश तिडके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तपास अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

सामाजिक माध्यमांचा गैरवापर – नागरिकांनी घ्यावी सावधगिरी!या प्रकारामुळे सोशल मीडियावर वाढत चाललेल्या फेक प्रोफाईल्स, आक्षेपार्ह मजकूर व द्वेषयुक्त कंटेंटच्या विरोधात पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. इंटरनेट हा माहितीचा झरा असला तरी तो जबाबदारीने वापरणे आवश्यक आहे.कोणतीही पोस्ट शेअर करताना तिच्या परिणामांची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. धार्मिक भावना दुखावणारे, जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे किंवा अशांतता भडकावणारे पोस्ट टाकणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते.

तुमच्या कृतीमुळे समाजात गोंधळ निर्माण होतो का, याचा विचार करा. सोशल मीडियावर “फ्रीडम ऑफ स्पीच” आहे, पण ती “फ्रीडम टू हेट” नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!