दानापूर (वा) तळेगाव येथील स्व. राजीव गांधी विद्यालय संलग्न डॉ. जे.डी. विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले.
या यशाबद्दल दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे आयोजित सत्कार समारंभात विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. सुचिताताई पाटेकर (माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प. अकोला), रतनसिंग पवार (प्राथमिक शिक्षणाधिकारी), अँड. मोतीसिंह मोहता (अध्यक्ष, बेरार एज्युकेशन सोसायटी), प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, श्री. प्रमोदजी टेकाडे, डॉ. पुनम अग्रवाल, व प्रा. राजेश चंद्रवंशी यांची उपस्थिती होती.
गौरवप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कु. अमृता गोपाल माहोकार, आदर्श दिलीप खराटे, व आदित्य राजेश्वर खारोडे यांचा समावेश होता. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी मुख्याध्यापिका सौ. सुनिताताई गिऱ्हे, मार्गदर्शक सुनिल भास्कर सर, इतर सर्व शिक्षकवर्ग व पालकांना दिले.
या गुणवंत विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर आपली नावे उजळवून विद्यालयाचे नाव गर्वाने उंचावले आहे. त्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व पालकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.