अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो दिनांक २९ मार्च २०२५:-. २९ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता अकोला येथील अशोक वाटिका चौक परिसरातील उड्डाणपुलावर आज दुपारी भीषण अपघात घडला टॉवरच्या दिशेने जात असलेल्या महिंद्रा मॅक्स (MH 30 P5686) या वाहनाचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर, समोरून येणाऱ्या किया चारचाकी (MH 27 DE 4651) गाडीला ही गाडी जाऊन धडकली.
या अपघातामुळे दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित मदतीसाठी पुढाकार घेतला आणि पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच खदान पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही वाहनांचे चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन्ही वाहनांना पुढील तपासासाठी आपल्या ताब्यात घेतले आहे.
नागरिकांकडून सुरक्षेची मागणी
उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी येथे अधिक बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अपघातानंतर प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही वाहन चालवताना नियमांचे पालन करावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी.